शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

28 वर्षांच्या मुलाला घाबरले नितीश कुमार - तेजस्वी यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 09:14 IST

नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे. शिवाय, ते 28 वर्षांच्या एका मुलाला घाबरलेत, असेही तेजस्वी यादव म्हणालेत.

पाटणा, दि. 27 -  संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बुधवारी (26 जुलै ) तडकाफडकी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.  नितीश कुमार यांनी  बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपाने त्यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे.  बिहारमधील महायुती फूट पडल्यानंतर मात्र येथील राजकीय परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. 

बिहारमधील राजकीय घडामोडीनितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणात विरोधकांच्या खुर्चीत असलेल्या भाजपासोबत हातमिळवणी केली. नितीश कुमार यांना भाजपाचं समर्थन मिळाल्यानंतर जदयू व भाजपाचे आमदार राजभवनात पोहोचले आणि त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला.  राजभवनातून बाहेर आल्यानंतर भाजपाचे नेते सुशील कुमार मोदी यांना सांगितले की, राज्यपालांनी नितीश कुमार यांना गुरुवारी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. 

तेजस्वी यादव यांचा विरोधतर दुसरीकडे आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना सत्तास्थापना आणि शपथविधिसाठी देण्यात आलेले आमंत्रणाला विरोध दर्शवला आहे. याविरोधात आरजेडी व काँग्रेसच्या आमदारांनी बुधवारी रात्री राजभवनापर्यंत मोर्चादेखील काढला. आरजेडी नेत्यांसोबत राज्यपालांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव म्हणाले की, पार्टीनं राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांच्या शपथविधिबाबत पुन्हा समीक्षा करण्याची विनंती केली आहे. शिवाय, कायद्यानुसार त्यांनी मोठ्या राजकीय पक्षाला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी बोलावले पाहिजे. 

पुढे ते असेही म्हणालेत की, नितीश कुमार अखेर कोणत्या आधारावर भाजपासोबत सत्तास्थापन करत आहेत. ते 28 वर्षांच्या एका मुलाला घाबरलेत. त्यांच्यात हिम्मत असल्यास त्यांनी पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. नितीश कुमार महायुती तोडून भाजपासोबत हातमिळवणी करण्यासाठी केवळ निमित्त शोधत होते, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला आहे. 

''बिहारच्या जनतेचा विश्वासघात''दरम्यान, तेजस्वी यादव व लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणासंबंधी सीबीआय व ईडीनं कारवाई केल्यापासून बिहारमधील महायुतीत गोंधळ निर्माण झाला.  तेजस्वी यादव यावर म्हणालेत की, आमच्याविरोधात कटकारस्थान रचून आरोप करण्यात आलेत. शिवाय, नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केल्याचेही ते म्हणालेत.