शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

रॉकेटच्या इंधनावर चालते नितीन गडकरींची नवी कार, जाणून घ्या हायड्रोजन कारबद्दल सर्व काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 13:14 IST

रॉकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाला हायड्रोजन इंधन म्हणतात, यातून अतिशय कमी प्रमाणात प्रदूषण होतं. पण, या इंधनाची आणि त्यावर चालणाऱ्या गाड्यांची किंमत खूप जास्त आहे.

नवी दिल्ली: पेट्रोल-डिझेल महागल्याने लोक आता अन्य पर्यायांकडे वळू लागले आहेत. यामध्ये सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. दरम्यान, असेही एक इंधन ज्यामुळे प्रदूषणाला आळा बसू शकतो आणि हे इंधन कारमध्ये वापरता येते. पण, हे इंधन खूप महाग आहे. मोठ-मोठ्या रॉकेटला अंतराळात नेण्यासाठी हे इंधन वापरले जाते. या इंधनाला हायड्रोजन फ्युअल म्हणतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच या इंधनावर चालणारी कार घेतली आहे. जाणून घेऊया या हायड्रोजन कारच्या वैशिष्ट्यांविषयी...

हायड्रोजन कार काय आहे?

हायड्रोजन कारमध्ये हायड्रोजन इंधन वापरले जाते. हे सहसा अवकाशात रॉकेट पाठवण्यासाठी वापरले जाते. मात्र काही वाहनांमध्ये या इंधनाचा वापरही केला जात आहे. भविष्यात हे इंधन ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवेल असा विश्वास आहे. यामध्ये हायड्रोजनच्या रासायनिक ऊर्जेचे REDOX अभिक्रियाद्वारे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. विशेष विकसित इंधन सेलमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यात प्रक्रिया करुन हे केले जाते.

हायड्रोजन कुठून येतो?

जीवाश्म इंधनाच्या विपरीत, हायड्रोजन सहसा कोणत्याही नैसर्गिक साठ्यामध्ये आढळत नाही. हे नैसर्गिक वायू किंवा बायोमास किंवा पाण्याने इलेक्ट्रोलायझिंग करुन बनवले जाते. हायड्रोजन पॉवरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते हरितगृह वायू उत्सर्जन कमी करते. विशेषत: जेव्हा पाण्याचे हायड्रोजनमध्ये रुपांतर करण्यासाठी अक्षय वीज वापरुन गॅसची निर्मिती केली जाते. आइसलँडमध्ये हायड्रोजन तयार करण्यासाठी भू-औष्णिक ऊर्जा वापरली जात आहे. डेन्मार्कमध्ये ते पवन ऊर्जेपासून बनवले जात आहे.

हायड्रोजन इंधनचे फायदे काय आहेत?

हायड्रोजन इंधन पारंपरिक इंजिनच्या तुलनेत फायदे आणि तोटे दोन्ही देतात. हे इंधन अधिक विश्वासार्ह आणि अधिक कार्यक्षम आहे. हे अधिक प्रभावी आहे कारण रासायनिक ऊर्जा थेट विद्युत उर्जेमध्ये रुपांतरित होते. प्रथम त्याचे उष्णतेत आणि नंतर यांत्रिकात रुपांतर होत नाही. त्याला 'थर्मल स्पाउट' म्हणून ओळखले जाते. हायड्रोजन इंधन सेल पारंपारिक इंधन असलेल्या कारपेक्षा उत्सर्जनाची पातळी खूपच कमी आणि स्वच्छ असते. काही देशांमध्ये हायड्रोजन इंधन असलेल्या वाहनांवर कमी कर आकारला जातो. एकदा त्याची टाकी भरली की 482 किमी ते 1000 किमी अंतर कापता येते.

हायड्रोजन कारसाठी सध्या कोणती आव्हाने आहेत?

हायड्रोजन इंधनाचे जेवढे फायदे आहेत तेवढीच आव्हानेही आहेत. यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याचे उत्पादन खूप महाग आहे. सुरुवातीला इंधन सेल डिझाइन देखील कमी तापमानात कार्य करण्यास सक्षम नव्हते. मात्र आता तंत्रज्ञानाने या समस्येवर मात केली आहे. इतर वाहनांच्या तुलनेत इंधन सेलचे आयुष्य देखील चांगले आहे. हायड्रोजन वाहनांसाठी सध्या फिलिंग स्टेशनची कमतरता आहे. ब्रिटनसारख्या देशातही ते फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. हायड्रोजन इंधन पेट्रोल आणि डिझेलपेक्षा महाग आहे. पण त्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. हायड्रोजन वायू अत्यंत ज्वलनशील आहे, अशा परिस्थितीत जेव्हा ते इंधन टाकीमध्ये पूर्णपणे भरले जाते, तेव्हा वाहन चालवताना अपघाताचा धोका असतो. 

हायड्रोजन कारची किंमत किती आहे?

हायड्रोजन कार आता अनेक देशांमध्ये उपलब्ध आहेत. या कार भारतातही आयात केल्या जाऊ शकतात. Toyota Mirai, Hyundai Nexo आणि Honda Clarity या काही कंपन्या याची आयात करतात. ही कार अतिशय चांगल्या आणि मजबुत मालापासून तयार केली जाते, त्यामुळे याची किंमतही खूप जास्त आहे. एका अंदाजानुसार, 35-40 लाख रुपयांपासून या कारच्या किमती सुरू होतात. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcarकार