शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जैन इरिगेशनच्या सौरऊर्जा संशोधन प्रकल्पाला नितीन गडकरी यांची भेट

By admin | Updated: January 26, 2016 00:04 IST

सौर कृषि पंपाच्या प्रसारासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन- नितीन गडकरी

सौर कृषि पंपाच्या प्रसारासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन- नितीन गडकरी
जळगाव- भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेता शाश्वत शेतीच्या व शेतकर्‍यांच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने सौर कृषि पंपाची उपलब्धी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. उच्च कृषि तंत्रज्ञानासह कृषि क्षेत्राला नवी दिशा देणारे हे तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावे यासाठी जैन इरिगेशन अधिकाधिक योगदान देईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. जैन इरिगेशनच्या सौर कृषिपंप गुणवत्ता संशोधन प्रकल्पास व फलोत्पादन संशोधन केंद्रास त्यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. यवेळी त्यांच्या समवेत कृषिमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. जैन इरिगेशनतर्फे कंपनीचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांचे स्वागत केले, संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी त्यांना विविध प्रकल्पांची माहिती दिली.
सौर कृषिपंपाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता हे पंप प्रत्यक्ष शेतीवरही पूर्ण क्षमतेने दीर्घकाल चालावे यासाठी जैन इरिगेशनने भर दिला आहे. भारतातील नैसर्गिक स्थिती लक्षात घेऊन कृषिक्षेत्राच्या गरजेनुरुप यात शेतकर्‍यांना साध्य करता येतील, असे बदलही यात केले आहेत. जैन इरिगेशनच्या एनर्जी पार्क येथीलसौर कृषिपंपाच्या टेस्टींग लॅबला भेट देऊन गडकरी यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीत त्यांनी येथील फलोत्पादन प्रात्यक्षिक क्षेत्रावर भेट देऊन अतिघनदाट पेरु व मोसंबी लागवड क्षेत्राची पाहणी केली. जगात प्रथमच जैन इरिगेशनने भारतीय जमिनीत शेतकर्‍यांना भरघोस पेरुचे उत्पादन होईल असे उतिसंवर्धित पेरुची रोपे विकसित केली आहे. मोसंबी फळांमध्ये जैन इरिगेशनने संशोधनात मैलाचा टप्पा गाठला आहे.
कॅप्शन-
जैन इरिगेशनच्या सौर कृषि पंपाच्या प्रात्यक्षिक वाहनाचा शुभारंभ करताना नितीन गडकरी. डावीकडून अमर जैन, संजय सावकारे, उन्मेष पाटील, अशोक जैन, अतुुल जैन, एकनाथराव खडसे, भवरलाल जैन, गिरीश महाजन, शिरीष चौधरी, ए.टी.पाटील, चैनसुख संचेती आदी.