शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशी घरे बांधा नितीन गडकरींचे आवाहन : वाशीमध्ये मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन

By admin | Updated: December 14, 2014 00:07 IST

नवी मुंबई : बांधकाम व्यावसायिकांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करून बांधकामांवर होणारा खर्च कमी करावा. सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी. एकाच प्रकल्पामध्ये श्रीमंत होण्याचा विचार करू नये, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबई : बांधकाम व्यावसायिकांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करून बांधकामांवर होणारा खर्च कमी करावा. सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी. एकाच प्रकल्पामध्ये श्रीमंत होण्याचा विचार करू नये, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईच्यावतीने १५ व्या मालमत्ता प्रदर्शनाचे गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते म्हणाले की, ५० लाख ते १ कोटी रुपये किमतीची घरे खरेदी करण्याची क्षमता फक्त १ ते २ टक्के नागरिकांमध्ये आहे. यामुळे अनेक इमारती बांधून झाल्या असून घरांची विक्री होत नाही. देशात अनेक शहरांमध्ये मंदीचे वातावरण आहे. यामुळे व्यावसायिकांनी महागडे प्रकल्प उभे करण्यापेक्षा सामान्य नागरिकांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी. तसेच व्यवसायामध्ये पारदर्शीपणा असला पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. नवी मुंबईतील कोळी बांधवांसाठी छोटेसे बंदर विकसीत करण्याची मागणी यावेळी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गडकरी यांच्याकडे केली. तर महापौर सागर नाईक यांनी महापालिकेच्यावतीने देण्यात येणार्‍या सुविधांविषयी माहिती दिली. यावेळी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवांग त्रिवेदी, आमदार सुधाकर भालेराव, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे, धर्मेंद्र कारीया, वसंत भद्रा, रसिक चौहाण, एम. सी. सनी, मनीष भटीजा, हेमंत लखाणी, हरेश छेडा, ए.आर.खत्री उपस्थित होते. चौकटराज्यात जलवाहतुकीस प्राधान्य केंद्र शासनाच्यावतीने राज्यात राबविण्यात येणार्‍या योजनांविषयी माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले की, मुंबई - गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच तीन बंदरे विकसित करण्याचा मानस आहे. बीपीटीमध्ये पॅसेंजर टर्मिनल उभारण्यात येणार आहे. सीप्लेन भारतामध्येच बनविण्याविषयी विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जेएनपीटीमधील सेझमध्ये जवळपास दीड लाख रोजगार उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समुद्रमार्गे वाहतूक वाढविण्यास प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ----मंदाताईंची कोपरखळीआमदार मंदा म्हात्रे त्यांच्या भाषणात म्हणाल्या की, माजी आमदार असल्यामुळे गत वर्षी मला खाली बसावे लागले होते. तेव्हा मी म्हणाले होते की, पुढील वर्षी तुम्हाला माझे नाव आमंत्रण पत्रिकेवर टाकावे लागेल व सन्मानाने व्यासपीठावर बसवावे लागेल. या वर्षी आमदार असल्याने सन्मानाने व्यासपीठावर आले. प्रत्येकाचे दिवस बदलत असतात, अशी कोपरखळी त्यांनी या वेळी मारली.-----फोटो बिल्डर चौकट नावाने दुसरी फाईल टाकत आहे