शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयाच्या मारेकऱ्याची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 06:50 IST

मानसिक आजार असल्याचा दावा सिद्ध झाला नाही

नवी दिल्ली : निर्भयाचा मारेकरी विनय शर्मा हा मानसिक आजारी असून त्याच्या उपचारासाठी याचिकेद्वारे विनंती करण्यात आली होती. मात्र तिहार कारागृह प्रशासनाने दाखल केलेल्या पुराव्यांवरून विनय शर्माला कुठलाही मानसिक आजार नसल्याचे सिद्ध होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि याचिका फेटाळून लावली.विनय शर्माच्या अर्जावरील पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी झाली. अलीकडेच विनय आपल्या आईसोबत दोनवेळा फोनवर बोलला. तरीही तो लोकांची ओळख विसरू लागला आहे, असा दावा त्याचे वकील कसा करू शकतात, असा सवाल तिहार प्रशासनाने उपस्थित केला होता. विनयने भिंतीवर डोके आपटल्यामुळे झालेली दुखापत वगळता त्याला कुठलाही त्रास नाही, असेही न्यायालयाला सांगण्यात आले. यावेळी कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्यात आले. आज सकाळी सुनावणी सुरू होताच तिहार प्रशासनाने विनयचे सर्व वैद्यकीय अहवाल सादर केले. त्याला जुना कुठलाही आजार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. ‘विनय मानसिक आजारी असेल तर त्याने आपल्या वकिलांशी फोनवर बोलून सगळी माहिती कशी दिली असती,’ असा सवालही तिहार प्रशासनाची बाजू मांडताना अ‍ॅड. इरफान अहमद यांनी उपस्थित केला. १६ फेब्रुवारीला विनयने कारागृहात भिंतीवर डोके आपटून घेतल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यासंदर्भातील दोन्ही पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी विनयची याचिका फेटाळून लावली. येत्या ३ मार्चला सकाळी ६ वाजता मारेकऱ्यांना तिहार कारागृहात फाशी देण्यात येईल.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप