शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

‘निर्भया’ची विटंबना!

By admin | Updated: March 5, 2015 02:14 IST

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील एका आरोपीच्या बीबीसीच्या प्रतिनिधीने तिहार तुरुंगात जाऊन घेतलेल्या मुलाखतीवरून बुधवारी संसदेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

बीबीसीकडून बलात्काऱ्याची मुलाखत : संसदेत संताप, माहितीपटावर बंदीनवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील एका आरोपीच्या बीबीसीच्या प्रतिनिधीने तिहार तुरुंगात जाऊन घेतलेल्या मुलाखतीवरून बुधवारी संसदेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सरकारनेही बीबीसीचा हा माहितीपट ही देशासाठी अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचे सांगून तोे कदापि प्रसारित होऊ देणार नाही, असे ठासून सांगितले़ मुळात तिहार तुरुंगात आरोपीच्या मुलाखतीची परवानगी देण्यात आलीच कशी,याबद्दल खुद्द गृहमंत्री राजनाथसिंग यांनीही आश्चर्य व्यक्त केले. सदस्यांनी आपसातील राजकीय मतभेद बाजूला सारून या प्रकरणाला कडाडून विरोध केल्यानंतर गृहमंत्र्यांनी राज्यसभा आणि लोकसभेत निवेदन सादर करून दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही दिली. आरोपीची मुलाखत असलेल्या माहितीपटाच्या चित्रीकरणास कोण जबाबदार आहे, याची चौकशी करून दोषींवर कठोर केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा उपस्थित झाला. हा वादग्रस्त माहितीपट भारतात कदापि प्रसारित होऊ देणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली. यावर सदस्यांनी विदेशात जर हा माहितीपट प्रसारित झाल्यास काय, असा प्रश्न उपस्थित केला. यावर तो कुठेही प्रसारित होणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. परवानगी घेऊन मुलाखतअशा गुन्ह्याच्या एका अध्ययनासाठी गृह मंत्रालयाच्या वतीने जुलै २०१३ मध्ये परवानगी देण्यात आली होती. त्या अनुषंगाने एका विदेशी महिलेसह दोन पत्रकारांनी तिहार कारागृहात जाऊन मुलाखत घेतली होती. लिखित पूर्वपरवानगी घेणे आणि असंपादित फुटेज कारागृह अधिकाऱ्यांना दाखविण्याची अट घालण्यात आली होती. नंतर कारागृह अधिकाऱ्यांनी ७ एप्रिल २०१४ रोजी याप्रकरणी माहितीपट निर्मात्यास कायदेशीर नोटीस पाठविली, तेव्हा त्यांना या मुलाखतीचे असंपादित फुटेज दाखविण्यात आले. त्यात आरोपीने अत्यंत आक्षेपार्ह विधाने केल्याचे दिसल्याने निर्मात्यास ही मुलाखत प्रसारित करू नका, असे सांगितले होते.परवानगी देणाऱ्यावर कारवाई कराच्काँग्रेसचे रंजित रंजन म्हणाले, की मुली रात्री घरातून बाहेर का पडतात, तसे कपडे का परिधान करतात, असे प्रश्न उपस्थित करून मुलींनाच जबाबदार ठरविण्याचा निर्लज्जपणा आरोपीने दाखविला आहे. च्भाजपाच्या किरण खेर, मीनाक्षी लेखी यांनीही रोष जाहीर करून मानसिकता बदलण्याची गरज व्यक्त केली. सेनेचे विनायक राऊत यांनी शिक्षा झालेल्या आरोपीच्या मुलाखतीची परवानगी देणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली. च्माकपचे के.ए. संपत यांनी या माहितीपटात आरोपीच्या वकिलानेही बलात्कारासाठी महिलांनाच दोषी ठरवून भीषण गुन्ह्यातील आरोपींचेच समर्थन केले आहे, याकडे लक्ष वेधले.‘बलात्कारी’ वक्तव्य !निर्भयावर क्रूर अत्याचार करणाऱ्यांपैकी एक आरोपी मुकेश सिंगने रात्री बाहेर पडणाऱ्या महिलाच आमच्यासारख्यांना आकर्षित करतात, असे ‘बलात्कारी’ विधान केले.कारागृहात कैद्यांची मुलाखत घेण्याची तरतूद असू शकते. परंतु ज्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाने बलात्कारी ठरविले आहे, त्याच्या मुलाखतीची परवानगी दिली जावी, ही बाब आश्चर्यकारक आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि गरज पडल्यास कैद्यांच्या मुलाखतीची परवानगी देणाऱ्या तरतुदीचा आढावा घेऊन आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल. - राजनाथसिंग, केंद्रीय गृहमंत्री ब्रिटनमध्ये माहितीपट दाखविणारचलंडन : दिल्लीतील ‘निर्भया’ सामूहिक बलात्कारावरील माहितीपट ( इंडियाज डॉटर) बीबीसी-४ वरून स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता (भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० ) ब्रिटनमध्ये प्रसारित करण्याचा निर्णय बीबीसीने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हा माहितीपट ८ मार्च रोजी प्रसारित करण्याचा बीबीसीने निर्णय घेतला होता.