शेतकरी आत्महत्यांची नऊ प्रकरणे मदतीसाठी पात्र
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST
अकोला : शेतकरी आत्महत्यांच्या नऊ प्रकरणांमध्ये तातडीने मदत देण्याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत शिक्कामोर्तब झाले. ही ९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत.
शेतकरी आत्महत्यांची नऊ प्रकरणे मदतीसाठी पात्र
अकोला : शेतकरी आत्महत्यांच्या नऊ प्रकरणांमध्ये तातडीने मदत देण्याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत शिक्कामोर्तब झाले. ही ९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत.जिल्हास्तरीय समितीच्या सभेत एकूण नऊ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांवर चर्चा झाली व ही सर्व प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील मांजरी येथील पुरुषोत्तम श्रीधर पवार, व्याळा येथील वासुदेव सूर्यभान वाशिमकर, अकोला तालुक्यातल्या उगवा येथील विनोद देविदास मेश्राम, अन्वी येथील हकीमखाँ रहीमखाँ ऊर्फ दुलेखाँ रहिमखाँ, बार्शीटाकळी तालुक्यातल्या साल्पी येथील धनराज शेषराव क्षीरसागर, सुकळी येथील जनार्दन गुणाजी पांडे, मूर्तिजापूर तालुक्यातल्या लाखपुरी येथील राजू नारायण चव्हाण व उमई येथील सिद्धार्थ विठ्ठल जामनिक आदी नऊ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे सदस्य सभेला उपस्थित होते.