एकरुखे सोसायटीच्या सभापतिपदी निवृत्ती जाधव
By admin | Updated: April 4, 2015 01:54 IST
वडाळीभोई : एकरुखे-ही-जैतापूर या तीन गावांचा समावेश असलेल्या एकरुखे सोसायटीच्या सभापती पदासाठी चुरशीची निवडणूक झाली. सभापती पदासाठी दोन अर्ज आले होते. त्यापैकी निवृत्ती जाधव यांना दहा मते मिळाली, तर प्रकाश धनाईत यांना तीन मते मिळाली. एकूण तेरा संचालकांनी मतदान केले. उपसभापतिपदी अजितसिंग मानिक परेदशी हे बिनविरोध निवडून आले. या निवडणुकी प्रसंगी संचालक चंद्रभान जाधव, काशीनाथ जाधव, अलका परदेशी, निर्मला परदेशी, भाऊसाहेब जाधव, शांताबाई माळी, सोमनाथ परदेशी, दत्तात्रय धनाईत, रमन सुंभे, दशरथ खैरे, प्रकाश धनाईत हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. अहिरे यांनी काम बघितले त्यांना सहकार्य सोसायटीचे सचिव अरुण जाधव यांनी केले. यावेळी माजी सरपंच भास्कर जाधव सरपंच नीलेश परदेशी, शंकर जाधव, नंदू परदेशी, सचिन परदेशी
एकरुखे सोसायटीच्या सभापतिपदी निवृत्ती जाधव
वडाळीभोई : एकरुखे-ही-जैतापूर या तीन गावांचा समावेश असलेल्या एकरुखे सोसायटीच्या सभापती पदासाठी चुरशीची निवडणूक झाली. सभापती पदासाठी दोन अर्ज आले होते. त्यापैकी निवृत्ती जाधव यांना दहा मते मिळाली, तर प्रकाश धनाईत यांना तीन मते मिळाली. एकूण तेरा संचालकांनी मतदान केले. उपसभापतिपदी अजितसिंग मानिक परेदशी हे बिनविरोध निवडून आले. या निवडणुकी प्रसंगी संचालक चंद्रभान जाधव, काशीनाथ जाधव, अलका परदेशी, निर्मला परदेशी, भाऊसाहेब जाधव, शांताबाई माळी, सोमनाथ परदेशी, दत्तात्रय धनाईत, रमन सुंभे, दशरथ खैरे, प्रकाश धनाईत हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. अहिरे यांनी काम बघितले त्यांना सहकार्य सोसायटीचे सचिव अरुण जाधव यांनी केले. यावेळी माजी सरपंच भास्कर जाधव सरपंच नीलेश परदेशी, शंकर जाधव, नंदू परदेशी, सचिन परदेशी, बापू जाधव, वसंत जाधव, संजय जाधव आदिंनी केले. (वार्ताहर)