शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘लव जिहाद’ची एनआयए चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 04:29 IST

धर्मांतर करून हिंदू तरुणीशी करण्यात आलेला विवाह ‘हा लव जिहाद’चा प्रकार असल्याचे सांंगत केरळ उच्च न्यायालयाने हा विवाह रद्द केल्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.

नवी दिल्ली : धर्मांतर करून हिंदू तरुणीशी करण्यात आलेला विवाह ‘हा लव जिहाद’चा प्रकार असल्याचे सांंगत केरळ उच्च न्यायालयाने हा विवाह रद्द केल्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. न्यायालयाने याप्रकरणी राष्टÑीय तपास संस्थेला (एनआयए) या कथित लव जिहाद प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने एनआयएच्या अहवाल आल्यानंतर याप्रकरणी विचार करणार असल्याचे स्पष्ट केले. शफीन जहान या तरुणाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने एनआयएला चौकशी आदेश दिले आहेत. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंह यांनी सांगितले की, अशाच प्रकारे आणखी एक प्रकरण आले होते. ही प्रकरणे एकाच संघटनेशी संबंधित आहेत.केरळ सरकारने एनआयए चौकशीला हरकत नसल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर. व्ही. रवींद्रन यांच्या देखरेखीखाली चौकशी केली जाईल, असे न्यायपीठाने सांगितले. शफीन जहान याने केरळ हायकोर्टाचा आदेश रद्दबातल ठरविण्याची मागणी केली आहे. केरळ उच्च न्यायालयाने विवाह अवैध ठरवत तरुणीची रवानगी आई-वडिलांकडे केली. मुलीच्या वडिलांनी विवाह रद्द ठरविण्याची विनंती केली होती. मात्र, संबंधित मुलीचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी केली.