शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

एनजीओंना वनक्षेत्रात प्रवेश बंदी, हस्तक्षेपाला लगाम

By admin | Updated: October 14, 2016 00:59 IST

वन्यजीव आणि वनविभागात सामाजिक संस्था (एनजीओ) म्हणून काम करणाऱ्यांना आता वनक्षेत्रात प्रवेशासाठी वनाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे

उपवनसंरक्षकांचे फर्मान : वनपरिक्षेत्रधिकाऱ्यांना पाठविले पत्रअमरावती : वन्यजीव आणि वनविभागात सामाजिक संस्था (एनजीओ) म्हणून काम करणाऱ्यांना आता वनक्षेत्रात प्रवेशासाठी वनाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. एनजीओंनी विना परवानगीने वनक्षेत्रात प्रवेश केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध वन अधिनियमानुसार कारवाईचे फर्मान उपवनसंरक्षकांनी काढले आहेत. त्यामुळे आता वनविभागात एनजीओंच्या हस्तक्षेपाला लगाम लागणार आहे.वनक्षेत्रात कोणत्याही घडामोडी घडल्या की त्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होते. या घटनेची सत्यता अथवा वस्तुस्थिती तपासून न पाहता विविध संस्थांचे एनजीओ क्षणात सदर माहिती सार्वत्रिक करत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. अलीक डे काही जणांनी एनजीओच्या नावाखाली वनक्षेत्रात धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. वनक्षेत्रात नागरिकांचा सततचा वावर ही बाब वन्यपशू, वन्यजीवांसाठी धोकादायक ठरणारी आहे. त्यामुळे वनक्षेत्रात वनाधिकारी अथवा वनकर्मचारी यांच्याशिवाय कोणीही परवानगी न घेता प्रवेश केल्याचे दिसून आल्यास अशाविरुद्ध गंभीर स्वरुपाचे वनगुन्हे दाखल करण्याबाबतचे पत्र मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांच्या आदेशानुसार उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना पाठविले आहे. उपवनसंरक्षकांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे कनिष्ठ वनकर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. काही दिवसांपूर्वी पोहरा- वडाळीच्या वनक्षेत्रात अवैध चराई करताना काठेवाडी गुरे जेरबंद करण्यात आले होते. मात्र काठेवाडींनी बळजबरीने काही गुरे वनविभागाच्या ताब्यातून सोडवून नेली आहेत. या घटनेमुळे वनविभागाने वनक्षेत्रात बाहेरील व्यक्तिच्या प्रवेशास मनाई केली आहे. वनक्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकांना परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही नियमावली एनजीओंना देखील लागू करण्यात आली आहे. वनक्षेत्रात एनजीओंना कशासाठी प्रवेश करायचा आहे, ही बाब वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या पुढ्यात स्पष्ट करावी लागणार आहे. उपवनसंरक्षकांच्या नव्या फतव्यामुळे वनक्षेत्रातील अनेक नियमबाह्य प्रकाराला आळा बसणार आहे.