शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींवरील खटल्याची पुढील सुनावणी ६ मार्चला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 07:55 IST

राहुल गांधी यांचे वकील काशीप्रसाद शुक्ला यांनी सांगितले की, याचिकाकर्त्याची ११ फेब्रुवारी रोजी उलटतपासणी झाली होती.

सुलतानपूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल असलेल्या बदनामीच्या खटल्याची पुढील सुनावणी ६ मार्चला घेण्याचे खासदार/आमदार विशेष न्यायालयाने ठरविले आहे. २०१८ साली कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांत राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपचे स्थानिक नेते मिश्रा यांनी हा खटला दाखल केला.

राहुल गांधी यांचे वकील काशीप्रसाद शुक्ला यांनी सांगितले की, याचिकाकर्त्याची ११ फेब्रुवारी रोजी उलटतपासणी झाली होती. ती पूर्ण झाल्यावर सोमवारी या याचिकेची सुनावणी होणार होती. पण याचिकाकर्त्याचे वकील संतोष कुमार पांडे न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल दाखल झालेल्या खटल्यात सुनावणीप्रसंगी ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. याबाबत न्यायालयाकडून राहुल गांधी यांना वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर २०२३मध्ये ते न्यायालयात उपस्थित राहिले होते. विशेष न्यायाधीशांनी राहुल गांधी यांना २५ हजार रुपयांच्या दोन हमीपत्रांवर जामीन मंजूर केला.  (वृत्तसंस्था)

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी