शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही राज्यसभेचे कामकाज गोंधळात तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 04:19 IST

या गोंधळामुळे सभापती वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब केले. त्यानंतर दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी सरकारने मान्य केली;

नवी दिल्ली : अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना राज्यसभेत कागदपत्रे मांडू देण्यास काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हरकत घेतल्याने मंगळवारी राज्यसभेत गोंधळ सुरू झाला. या गोंधळामुळे सभापती वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब केले. त्यानंतर दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी सरकारने मान्य केली; पण लगेच चर्चा करावी, ही मागणी मान्य न झाल्याने गोंधळ सुरूच राहिला. परिणामी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.अनुराग ठाकूर प्रकरणातील गदारोळानंतर कामकाज सुरू झाले, तेव्हाही गोंधळ सुरू झाला. आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी कागदपत्रे सभागृहात मांडल्यानंतर अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी कागदपत्रे मांडण्यास सुरुवात केली. ते उभे राहताच काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात ‘गोली मारो’चे प्रक्षोभक विधान केले होते.काँग्रेसचे सगळे सदस्य उभे राहून ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत होते. काँग्रेसला द्रमुकच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर द्यायला सुरुवात केली. गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.>लोकसभेतही गदारोळदिल्लीतील हिंसाचारावरून लोकसभेत दुसºया दिवशी मंगळवारीही गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत सभागृहाचे कामकाज चालविण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर सभापतींनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विधेयक सादर करण्यास सांगितले.संपूर्ण विरोधी पक्षाचे सदस्य घोषणाबाजी करीत होते आणि दिल्लीतील हिंसाचारावर चर्चेची मागणी करीत गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी करीत होते. विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती आणि त्यांनी काही कागद फाडले. तरीही सभापतींनी कामकाज सुरूच ठेवले. काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी सभापतींच्याजवळ पोहोचले आणि घोषणाबाजी केली. गोंधळ वाढत गेला तेव्हा सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा