रिक्षाबंदी बातमीचा जोड
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST
--कोट--
रिक्षाबंदी बातमीचा जोड
--कोट--प्रशासनाने रिक्षा बंद ठेवल्यामुळे आमच्यासोबत भाविकांचेही नुकसान केले़ शहरातील गल्ली-बोळाची माहिती असल्यामुळे आम्ही भाविकांना चांगली सेवा दिली असती़ प्रवासी वाहतुकीसाठी बसेसला परवानगी देता आणि आम्हाला मात्र व्यवसायबंदी केली़ भाविकांना त्यांच्या इच्छितस्थळी सोडण्यासाठी आम्हाला बामार्गाचा वापर करावा लागला़ या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी, पोलीस व आरटीओ विभागाला निवेदन देणार आहोत़हैदर सयद, अध्यक्ष, भद्रकाली ॲटो रिक्षा युनियन--कोट--एसटीने मुंबईहून येणार्या भाविकांकडून नाशिकचे पैसे घेतले मात्र त्यांना राजूर बहुला येथेच सोडले़ या ठिकाणाहून दुसर्या बसमध्ये बसल्यानंतर त्यांना पुन्हा तिकीट काढावे लागले़ एसटीने लूट केली तर चालते आणि रिक्षाचालकास बदनाम केले जाते़ व्यवसायबंदी करण्याचे अधिकार पोलीस वा एसटीच्या अधिकार्यांना नसताना त्यांनी प्रवासी उतरून घेतले़ प्रशासनाच्या या मनमानीविरोधात लवकरच जनहित याचिका दाखल करणार आहोत़भगवान पाठक, जिल्हा कार्याध्यक्ष, श्रमिक सेना़--कोट--अल्प शिक्षणामुळे स्वयंरोजगारासाठी रिक्षा व्यवसाय स्वीकारला़ सद्यस्थितीत नवीन रिक्षा घ्यावयाची म्हणजे सुमारे दीड लाख रुपये, परमिटसाठी पन्नास हजार रुपये असे किमान दोन लाख रुपये खर्च येतो़ बँकेचे व्याज वेगळेच, रिक्षाचालक दररोज कमविणार तेव्हाच त्याचा प्रपंच चालणाऱ मात्र प्रशासन कमाईच्या दिवसांमध्येच व्यवसायबंदी करीत असेल तर आम्ही जगायचे कसे़ सिंहस्थात सर्वांना व्यवसायाची संधी मिळते तशी आम्हाला मिळायला हवी़कैलास बारावकर, रिक्षाचालक़--कोट--रिक्षा व्यवसायामध्ये काही अपप्रवृत्ती नक्कीच आहेत़ मात्र एकामुळे सर्वच वाईट अशी तुलना कशी करतात़ इमानदारीने धंदा करून शासनाचे सर्व टॅक्स भरूनही ऐन मोक्याच्या दिवसांमध्ये जर रिक्षा बंद ठेवा असे सांगितले जात असेल तर आम्ही जगायचे कसे़ पोलीस, आरटीओ या सर्वांचा त्रास सहन करीत दिवसभर पै-पै आम्ही गोळा करतो़ सिंहस्थ कुंभमेळ्यात आम्हाला रिक्षा चालविण्याची परवानगी मिळायलाच हवी़वसीम शेख, रिक्षाचालक.