मनपा विद्यानिकेतन शाळा क्रमांक ४ मध्ये नवागतांचे स्वागत
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
सिडको : रायगड चौक येथील मनपा विद्यानिकेतन शाळा क्रमांक ४ शाळेत नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण नगरसेवक सुधाकर बडगुजर व शिक्षण मंडळ सदस्य हर्षा बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले.
मनपा विद्यानिकेतन शाळा क्रमांक ४ मध्ये नवागतांचे स्वागत
सिडको : रायगड चौक येथील मनपा विद्यानिकेतन शाळा क्रमांक ४ शाळेत नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण नगरसेवक सुधाकर बडगुजर व शिक्षण मंडळ सदस्य हर्षा बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले.सिडको ही सर्वसामान्य नागरिकांची वसाहत असून, येथील विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण देण्यास मनपा बांधील असल्याचे शिक्षण मंडळ सदस्य हर्षा बडगुजर यांनी केले. याप्रसंगी आयुक्त जीवन सोनवणे, मुख्याध्यापक पुंगडवाले, बुनगे, अनघा कुलकर्णी, कापडणे, जगन्नाथ कुर्हे, यशवंतराव गायकवाड, धनंजय बुचडे आदि उपस्थित होते.फोटो ओळीसिडको, रायगड चौक येथील मनपा विद्यानिकेतन शालेय नवागतांचे स्वागत करताना सुधाकर बडगुजरसमवेत हर्षा बडगुजर, जीवन सोनवणे, पंगुडवाले आदि.