शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! २९ दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं; हॉस्पिटलबाहेर येताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:44 IST

या घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. याबाबत दोषींवर कारवाई करण्याऐवजी सिव्हिल सर्जन त्यांना वाचवताना दिसत होते.

कटनी - मध्य प्रदेशातील कटनी जिल्हा रुग्णालयातील SNCU मध्ये नर्सिंग स्टाफचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. २९ दिवसांचे नवजात बालक मृत झाल्याचं सांगून नातेवाइकांना घरी जाण्यास सांगितले.  मात्र हॉस्पिटलबाहेर येताच मुलाचा श्वासोच्छवास सुरू असल्याचा संशय कुटुंबाला आल्याने त्यांनी तात्काळ ओपीडीमध्ये जाऊन डॉक्टरांना ही बाब सांगितली. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता बालकाचा श्वासोच्छवास सुरू असल्याचं सांगण्यात आले. 

या घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. याबाबत दोषींवर कारवाई करण्याऐवजी सिव्हिल सर्जन त्यांना वाचवताना दिसत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हरैया गावात राहणारा सोनूपती विष्णू चौधरी विजयराघवगड हिची जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. तिला २९ दिवसांचे बाळ होते. बाळ बरे झाल्यावर  महिलेला घरी सोडण्यात आले त्यानंतर आई आणि मूल दोघेही घरी गेले. मात्र घरी आल्यानंतर मुलाची प्रकृती अचानक बिघडल्याने शुक्रवारी दुपारी त्याला पुन्हा एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आले, तेथे उपचार सुरू होते. पण काही वेळाने नर्सिंग स्टाफने सांगितले की, आता तुमच्या मुलाचा श्वास थांबला आहे. त्याला घरी घेऊन जा, मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला, आई वडील रडू लागले, मृत मुलाला रुग्णालयातून बाहेर आणत घरी निघाले. 

परंतु काही क्षणात मुलाचा श्वास सुरू असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांनी ओपीडीमध्ये बसलेल्या डॉक्टरांना ही बाब सांगितली. या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा मुलाच्या हृदयाचे ठोके चालू होते. यानंतर कुटुंबियांनी तात्काळ मुलाला खासगी रुग्णालयात नेले, तेथे मुलावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाबाबत सिव्हिल सर्जन डॉ. यशवंत वर्मा म्हणाले, मुलाचा श्वास बंद झाल्यानं नर्सिंग स्टाफनं हे सांगितले असेल. मात्र कुटुंबियांनी न सांगता मुलाला रुग्णालयातून नेले आहे. हॉस्पिटलमधील प्रत्येक मूल निरोगी असावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो असं डॉक्टरांनी म्हटलं. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून घडलेल्या प्रकारामुळे मुलाच्या आई वडिलांसह नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"