शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ग्रँट इलियट मूळचा दक्षिण आफ्रिकेचाच

By admin | Updated: March 24, 2015 19:56 IST

तडाखेबाज खेळी करत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचे तिकीट कन्फर्म करणारा फलंदाज ग्रँट इलियट हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचाच.

 ऑकलंड, दि. २४ - तडाखेबाज खेळी करत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचे तिकीट कन्फर्म करणारा फलंदाज ग्रँट इलियट हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचाच. जोहान्सबर्ग येथे जन्मलेल्या इलियटनेच आफ्रिकेचा पराभव करुन न्यूझीलंडला विजय मिळवून दिल्याचा अनोखा योगायोग सेमी फायनलमध्ये जुळून आला आहे.

 
वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये मंगळवारी न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका हे संघ आमने सामने होते. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जाण्याचा पहिला मौका साधण्यासाठी दोन्ही संघ आसूसलेले होते. अपेक्षेप्रमाणे हा सामना कमालीचा चुरशीचा झाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारुन फायनलमध्ये धडक दिली. न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो नाबाद ८४ धावांची खेळी करणारा ग्रँट इलियट. विशेष म्हणजे हा इलियट मुळचा दक्षिण आफ्रिकेचाच. ३६ वर्षीय इलियटचा जन्म २१ मार्च १९७९ मध्ये जोहान्सबर्ग येथे झाला. २००१ मध्ये ग्रँटने नव्या संधीच्या शोधात न्यूझीलंड गाठले. स्थानिक स्पर्धांमध्ये वेलिंग्टन फायरबर्ड्सकडून खेळणारा इलियट हा उत्कृष्ट फलंदाजासोबतच चांगला गोलंदाजही. २००८ मध्ये न्यूझीलंडच्या निवड समितीची इलियटवर नजर पडली व न्यूझीलंड संघात त्याला मोका मिळाला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेद्वारे इलियटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कसोटी पदार्पण अपयशी ठरल्याने इलियटला संघातून वगळले. यानंतर इलियट क्लब क्रिकेट खेळण्यासाठी रवाना झाला. जेकब ऑरमला दुखापत झाल्याने इलियटला न्यूझीलंडच्या एकदिवसीय संघात संधी देण्यात आली. पहिल्याच सामन्यात त्याने गोलंदाजीने छाप पाडून न्यूझीलंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.  शांत संयमी स्वभाव, गॅप शोधण्याची कसब यासाठी इलियट ओळखला जातो. इलियट हा न्यूझीलंडचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून नावारुपाला येत आहे.