शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नववर्षाची शुभवार्ता : एसबीआयसह दोन बँकांकडून व्याजदरात कपात

By admin | Updated: January 2, 2017 06:19 IST

नोटाबंदीनंतर बँकांत मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या आहेत. याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना करून देण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर बँकांत मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या आहेत. याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना करून देण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर आता एसबीआय, आयडीबीआय, युनियन बँकेकडून कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. दरकपातीचे अनुकरण अन्य बँकांकडूनही होण्याची शक्यता आहे. २००८नंतरच्या जागतिक मंदीनंतरची ही सर्वांत मोठी व्याज दरकपात समजली जात आहे. दरात ०.९ टक्के कपात केल्याने एसबीआयच्या कर्जाचे आधारभूत दर आता ८.६५ टक्क्यांवरून ७.७५ टक्के झाले आहेत. बँकेचे एक वर्ष मुदतीचे कर्ज ८ टक्क्यांनी मिळेल तर दोन वर्षांच्या कर्जाला ८.१० टक्के तर तीन वर्षांसाठी ८.१५ टक्के व्याजदर असतील. एसबीआयचे नवे दर १ जानेवारीपासून लागू असतील. एसबीआयकडून महिलांच्या नावे देण्यात येणारे गृहकर्ज ८.२० टक्के दराने तर इतरांसाठी ८.२५ टक्के दराने गृहकर्ज मिळेल. भाषणात काय म्हणाले होते पंतप्रधान?देशातील बँकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. बँकांकडे एवढ्या कमी अवधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर याआधी पैसा आला नव्हता. त्यामुळे बँकांनी आपल्या परंपरागत अग्रक्रमांमधून बाहेर पडून गरीब, निम्न मध्यमवर्ग व मध्यवर्ग केंद्रस्थानी ठेवून आपला कारभार करावा. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यंदाचे वर्ष ‘गरीब कल्याण वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. या वर्षात लोकहिताचा कारभार करण्याची संधी बँकांनी गमावू नये.इतर बँकांचीही दरकपातयुनियन बँक आॅफ इंडियाने कर्जाच्या आधारभूत ०.६५ टक्के कपात केली आहे. हे दर ८.६५ टक्के असतील. आयडीबीआय आणि स्टेट बँक आॅफ त्रावणकोरने कर्जदरात कपात केली आहे. आयडीबीआयने तीन वर्षांसाठीच्या कर्जदरात ०.४० टक्के कपात केली असून, आता नवीन व्याजदर ९.३० टक्के असेल. सहा महिन्यांसाठी कर्जाचे व्याजदर ८.९० टक्के असतील. एक वर्ष मुदतीच्या कर्जाचे दर ९.१५ असतील. वाढीव ठेवी आल्याने व्याजदर स्वस्तनोटाबंदीनंतरच्या ५० दिवसांत बाद नोटांच्या स्वरूपात १४.९ लाख कोटींच्या वाढीव ठेवी बँकांत आल्या आहेत. त्यामुळे कर्जाच्या व्याजदरात कपात झाली आहे. अर्थात लोकांनी उपलब्ध असलेली कर्जे अधिक प्रमाणात घ्यावीत हाही यामागचा हेतू आहे.पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले, सिलिंडरही महागले...कर्ज स्वस्त होत असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल १.२९ रुपयांनी तर डिझेल ९७ पैशांनी महागले. वाहनमालकांना तेलकंपन्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इंधनमहागाईचा दणका दिला. वाढीव दरात व्हॅट गृहीत धरल्यास पेट्रोलचे दर १.६६ रुपयाने तर डिझेलचे भाव प्रति लीटर १.१४ रुपयाने वाढतात. ही भाववाढ रविवारी मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आली आहे.