शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

New Year 2022 : नवे वर्ष, तोच टास्क, तोंडावर हवा मास्क; जगभरात स्वागताचा जल्लोष, पर्यटनस्थळे आणि मंदिरांमध्ये मोठी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 07:00 IST

New Year 2022 : संपूर्ण मुंबईत दरवर्षी नाताळ व नववर्षानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु यंदा तसा प्रकार मुंबईच काय इतर मोठ्या शहरांमध्येही दिसून आला नाही. 

मुंबई/नवी दिल्ली : ओमायक्रॉन कोरोनाचा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारने नवे निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे पालन करीतच मुंबईसह राज्यभरातील नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. संपूर्ण मुंबईत दरवर्षी नाताळ व नववर्षानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु यंदा तसा प्रकार मुंबईच काय इतर मोठ्या शहरांमध्येही दिसून आला नाही. 

गर्दी जमेल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात आल्याने लोकांनी थर्टी फर्स्ट आपापल्या घरीच साजरा केला. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी यंदाही स्वच्छ हात अन् तोंडावर मास्क, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा संकल्प केल्याचे चित्र दिसून आले.  नव्या वर्षाचे स्वागत कऱण्यासाठी यंदा लोकांनी राज्यभरातील ठिकठिकाणची मंदिरे, पर्यटनस्थळे, समुद्रकिनारी अशा ठिकाणी गर्दी कोली. परंतु येथेही दरवर्षीप्रमाणे उत्साह दिसून आला नाही. गर्दी होऊ नये यासाठी पाेलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

भाविकांची गर्दीकोकणातील सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर शुक्रवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटत किनाऱ्यावरील पाण्यात भिजण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसले. नाशिकमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दी लोटली होती. येथे हजारो भाविक दाखल झाल्याने मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता. शिर्डी, पंढरपूर येथेही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्पांत या काळात लाखो देशी व परदेशी  पर्यटक जात असतात. यंदाही या सवर्व ठिकाणी त्यांनी एकच गर्दी केली होती. पण देशातील प्रत्येक राज्याने कोरोनाचे कडक नियम लागू केल्याने त्यांच्यावर अनेक बंधने आल्याचे दिसत होते. हाॅटेलांत शिरताना व तेथून बाहेर पडताना लोकांनी मास्क लावले आहेत का, हे तपासले जात होते. मास्कविना कुठेही प्रवेश दिला जात नव्हता. एवढेच नव्हे, तर हाॅटेल चालकांनी बुकिंग करताना लसीकरणाची प्रमाणपत्रे मागून घेतली होती. याशिवाय ते प्रत्यक्ष आले, तेव्हाही त्यांची प्रमाणपत्रे तपासण्यात येत हाेती. त्यामुळे आनंदात मिळाचा खडा पडल्याची प्रेमळ तक्रार अनेकांनी केली.

गोव्यात दरवर्षी या काळात परदेशांतून लाखो लाक येत असतात. गोवा हे परदेशी मंडळींचे आवडीचे ठिकाणच असते. पण तिथेही अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे समुद्र किनारी फिरणारे लोकही खिशात लसीकरण झाल्याचे वा आपला आरटीपीसीआर अहवाल घेउन फिरत होते. यंदा महाराष्गोर्टाी लोकांनी गोव्यापेक्षा कोकणालाच अधिक पसंती दिल्याचे जाणवत होते. गोव्याला गेलेले अनेक जण तेथील मंदिरांतही दशर्शनासाठी जात असल्याचे दिसून आले. 

उत्तर भारतात थंडीची लाट सुरू झाली आहे. त्यामुळे दक्षिणकेडील लोकांनी तिथे जायचे टाळले आणि आपले मावळते वर्ष जवळच्या राज्यांतमध्ये घालवण्याचा निणर्णय घेतला. मात्र पंजाब, मात्र पंजाब, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड येथील अनेकांनी नाताळ व मावळते वर्ष हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडामध्ये घालवले. तिथे उत्तर भारतीयांचीच अधिक गर्दी दिसत होती. मात्र कोरोनामुळे लोकांना हा रजेचा हक्काचा काळ आनंदात घालण्याच्या आड कोरोनाचा अडथळा येतच होता. 

देशभर कोरोनामुळे आनंद कमी होत असला तरी तो संपलेला नाही, हे मात्र दिसून आले. मुलाबाळांसह हजारो लोक विविध पर्यटन स्थळी तसेच मंदिरे व अन्य प्रार्थना स्थळांकडे जाताना दिसत होते. सवर्व चर्चमध्ये ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री विशेष प्रार्थना आयोजित केल्या जातात. यंदा मात्र त्यााी आॉनलाइन झाल्या. घरात बसूनच लोक त्यात सहभागी झाले. तसेच मंदिरातील पूजाअर्चाही टीव्हीवर वा आॉनलाइन पद्धतीने पाहण्यातच भारतीय गुंगून गेले होते. पुढील वर्ष तरी विनाविघ्नाचे जावो, अशी त्यांची इच्छा दिसत होती. 

अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई- अनेक ठिकाणी आकर्षक  विद्युत रोषणाई करण्यात आली होती. थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवर मुंबई पोलिसांची करडी नजर असल्यामुळे तरुणांनीदेखील मजा-मस्ती, धांगडधिंगा आणि पार्टीचा बेत रद्द केल्याचे दिसून आले. - मुंबईत संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक स्थळ, गार्डन, मैदान, समुद्रकिनारी जाण्यास पोलिसांकडून बंदी घातली होती. त्यामुळे मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडियासह विविध ठिकाणी जल्लोष करण्यासाठी एकत्र जमलेल्या नागरिकांनी पोलिसांनी हुसकावून लावले. यामुळे काहींचा हिरमोड झाला. - महाबळेश्वर, माथेरान, कोल्हापूरच्या अंबाबाई, ताडोबासह राज्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी आगाऊ नोंदणी करत हॉटेल बुक केली होती. पर्यटकांनी हॉटेल तसेच हॉटेलबाहेरही पडताना गर्दीमध्ये न जाता कुटुंबांसह जल्लोष केला. 

टॅग्स :New Yearनववर्ष