शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंध असूनही जगाला दिली नवी दृष्टी; कंचन गाबा यांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 01:46 IST

आठ वर्षे वयाची असताना माझ्या डोळ्यांची दृष्टी गेली आणि माझ्या आयुष्यात अंधार पसरला. मात्र यामुळे मी माझ्या आयुष्यात कधीच हार मानली नाही आणि मागेही वळून पाहिले नसल्याची माहिती कंचन गाबा यांनी दिली.

- सीमा महांगडे कोलकाता : आठ वर्षे वयाची असताना माझ्या डोळ्यांची दृष्टी गेली आणि माझ्या आयुष्यात अंधार पसरला. मात्र यामुळे मी माझ्या आयुष्यात कधीच हार मानली नाही आणि मागेही वळून पाहिले नसल्याची माहिती कंचन गाबा यांनी दिली. कोलकाता येथे आयोजित ५ व्या विज्ञान महोत्सवात महिला वैज्ञानिकांच्या परिषदेत त्या बोलत होत्या.अंध असूनही वकील असलेल्या कंचन गाबा या आता अंध मुलांच्या आयुष्याला नवीन दिशा देण्याचे काम करत असून अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांच्या महिला सबलीकरण समितीच्या सदस्य आहेत. शुक्रवारी उद्घाटन करण्यात आलेल्या महिला वैज्ञानिक आणि उद्योजिका परिषदेच्या पहिल्या सत्रात आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या मेजर जनरल माधुरी कानिटकर, निती आयोगाच्या सल्लागार डॉ. ना रे, कोलकाताच्या एस.एस.एन. बोस इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिक डॉ. तनुश्री सहा दासगुप्ता यांनी आपली उपस्थिती दर्शविली.डोळ्यांच्या पटलाला लागलेला मार व मोतीबिंदूही झाल्याने दुसरीत असतानाच कंचन यांना आपल्या दृष्टीला मुकावे लागले. मात्र, त्यांच्या आई वडिलांनी वर्षभर विविध ठिकाणी उपचार चालू ठेवले. अखेर त्यांना कोलकाताच्या अंध शाळेत दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ब्रेल लिपी शिकण्यास सुरुवात केली. दहावीत असताना दिव्यांग वर्गात त्यांनी प्रावीण्य मिळविले. शैक्षणिक उपलब्धीसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर गर्ल्स मीटचे दोन वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. इतकेच नाही तर रिव्हर राफ्टिंगसाठी देशविदेशात त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. पश्चिम बंगालमधील महिला कैद्यांच्या जीवनावरील प्रकल्पावर त्यांनी काम केले आहे. महिलांच्या मुद्द्यांमध्ये नेहमी मला संशोधन दिसले असून समाज आणि कायदा या विषयांमध्ये नेहमीच आवड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याच परिषदेच्या दुस-या सत्रात आलेल्या जिनिव्हाच्या नुक्लिअर रिसर्चसाठी प्रसिद्ध आॅर्गनायझेशन उएफठ मध्ये ३० वषार्हून अधिक वर्षे काम करणा-या अर्चना शर्मा यांचा प्रवासही परिषदेतील महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. थमार्मीटर रीसेट कसा कार्यच या प्रश्नाचे उत्तर मॅग्नेटिक फिल्डच्या सहाय्याने हे ऊत्तर देऊन सातवीत असताना अर्चना यांनी आपल्या भौतिकशास्त्राच्या शिक्षिकेला प्रभावित केले आणि पुढील २ पीएचडीचा प्रवास , लग्नानंतरही जबाबदा-्या सांभाळून जिनिव्हा येथील आपले संशोधन आणि कायम ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली.