शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनातील निष्कर्ष; ब्रिटनमधील नवा विषाणू घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 05:37 IST

संशोधनातील निष्कर्ष; मृत्यूचे प्रमाणही वाढले

लंडन : ब्रिटनमध्ये आढळलेला नव्या प्रकारचा कोरोना विषाणू त्याच्या आधीच्या प्रकारांपेक्षा ३० ते १०० टक्के इतक्या प्रमाणात अतिशय घातक आहे. यासंदर्भातील एका पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याच विषाणूने गेल्या वर्षीपासून ब्रिटनमध्ये हाहाकार माजविला आहे. या विषयावर ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूला बी. १.१.७ असेही म्हटले जाते. या विषाणूचा संसर्ग झालेल्या प्रौढ व्यक्तींमध्ये मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. 

हा नव्या प्रकारचा विषाणू व कोरोनाचे इतर प्रकारचे विषाणू यांनी बाधित झालेल्या रुग्णांचा अभ्यास करून एक्सेटर व ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी काही निष्कर्ष काढले आहेत. ब्रिटनमधील नव्या प्रकारच्या विषाणूची बाधा झालेल्या ५४,९०६ रुग्णांपैकी २२७ जणांचा मृत्यू झाला. तर इतर प्रकारच्या कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या ५४९०६ रुग्णांमध्ये १४१ जणांचा बळी गेला. त्यावरून नव्या प्रकारचा कोरोना विषाणू अधिक घातक आहे हे स्पष्ट  होते. 

६ राज्यांत ८५% रुग्ण n    महाराष्ट्रासहीत सहा राज्यांमध्ये कोरोनाचे ८५ टक्के नवे रुग्ण आहेत. त्यामध्ये केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. मात्र केरळमध्ये गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांची संख्या घटली तर महाराष्ट्रामध्ये ती वाढली आहे.

जगात २६ लाखांहून अधिक बळीn    जगभरात ११ कोटी ८६ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील ९ कोटी ४२ लाख जण बरे झाले. तसेच २ कोटी १७ लाख उपचाराधीन रुग्ण असून २६ लाख ३३ हजार जणांचा बळी गेला. n    अमेरिकेत २ कोटी ९८ लाखांहून रुग्ण आहेत. त्यापैकी २ कोटी ६ लाख लोक बरे झाले व ५ लाख ४२ हजार जणांचा बळी गेला. भारतामध्ये कोरोना रुग्ण, उपचाराधीन रुग्ण व बळींची संख्या अमेरिकेपेक्षा कमी आहे. ब्राझीलमध्ये १ कोटी १२ लाख रुग्ण असून बळींची संख्या २ लाख ७० हजार आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या