शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Omicron New Variant: चिंताजनक! आरटीपीसीआरला चकवा, ओमायक्रॉनचा नवा व्हेरिअंट घशातच राहत नाही, फुफ्फुसावरही हल्ला करतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 09:18 IST

Omicron New Variant in India: इंदौरमध्ये या व्हेरिअंटचे १२ रुग्ण सापडले असून यामध्ये ६ मुलेदेखील आहेत. BA.2 स्ट्रेन मूळ ओमायक्रॉनपेक्षाही वेगाने पसरत आहे.

ओमायक्रॉन कोरोना व्हायरसचा नवा प्रकार जन्माला आला असून त्याने भारतासह जगभराच्या चिंता वाढविण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉनचा मूळ व्हेरिअंट BA.1 आणि नुकताच सापडलेला नवा व्हेरिअंट BA.2 हे दोन्ही वेगवेगळे आहेत. भारतात या नव्या व्हेरिअंटचे ५०० हून अधिक रुग्ण सापडले असून इंदौरमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

इंदौरमध्ये या व्हेरिअंटचे १२ रुग्ण सापडले असून यामध्ये ६ मुलेदेखील आहेत. BA.2 स्ट्रेन मूळ ओमायक्रॉनपेक्षाही वेगाने पसरत आहे. त्याचबरोबर हा स्ट्रेन रुग्णांच्या फुफ्फुसावर देखील सर्वाधित परिणाम करत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ओमायक्रॉनचा मूळ स्ट्रेन BA.1 ही घशापर्यंतच जाऊन राहत होता. मात्र, नवा व्हेरिअंट डेल्टासारखाच फुफ्फुसावर हल्ला करत असल्याने चिंता वाढू लागली आहे. रुग्णांच्या फुफ्फुसामध्ये ५ ते ४० टक्क्यांपर्यंत इन्फेक्शन झाल्याचे दिसले आहे. ओमायक्रॉन आणि या व्हेरिअंटमध्ये हाच एक मोठा फरक आहे. BA.2 सब स्ट्रेनला स्टील्थ म्हणजे लपलेले व्हर्जन असे म्हटले जात आहे. हा स्ट्रेन आतापर्यंत ४० हून अधिक देशांमध्ये साप़डला आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनने या स्ट्रेनची माहिती दिली होती. तसेच हा स्ट्रेन भारतातही सापडल्याचे म्हटले होते. 

१७ वर्षांचा मुलगा गंभीर अरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या १७ वर्षांच्या रुग्णाच्या फुफ्फुसांवर ४० टक्के संक्रमण झाले आहे. तर दोन रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर चार रुग्णांमध्ये ओमायक्रॉन BA.1 असल्याचे समोर आले आहे. 

आरटीपीसीआरला चकमाBA.2 सब स्ट्रेनने आणखी एक वाढविलेली चिंता म्हणजे, तो आरटीपीसीआर चाचणीला देखील चकमा देऊ शकतो. स्टील्थ ओमायक्रॉनने युरोपमध्ये आणखी वेगवान लाटेची शक्यता निर्माण केली आहे. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या