शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाइलवर बोलण्यास नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 04:10 IST

आधी लावावे लागेल शून्य : २५४.४ कोटी अतिरिक्त क्रमांक होतील उपलब्ध

नवी  दिल्ली : येत्या एक जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्याच्या नियमांत मोठा बदल करण्यात येणार आहे. यानुसार देशभरात लँडलाइनवरून मोबाइलवर काॅल करण्यासाठी ग्राहकांना एक जानेवारीपासून मोबाइल नंबरच्या आधी शून्य (०) लावावे लागणार आहे. दूरसंचार विभागाने ट्रायच्या या निर्णयाला मान्यता दिली आहे. ट्रायने या प्रकारच्या कॉलसाठी मोबाईल क्रमांकाआधी शून्य लावण्याची शिफारस २९ मे २०२० रोजी केली होती. या निर्णयामुळे दूरसंचार कंपन्यांना अधिक क्रमांक देणे सोयीस्कर होणार आहे.

दूरसंचार विभागाने २० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकात म्हटले की, लँडलाइनवरून मोबाइलवर नंबर डायल करण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या ट्रायच्या शिफारशीला मान्यता देण्यात आली आहे. यामुळ‌े मोबाइल आणि लँडलाइन सेवांसाठी पुरेशा प्रमाणात नंबर देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या परिपत्रकातील उल्लेखानुसार हा नियम लागू करण्यात आल्यानंतर लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी मोबाइल क्रमांकाच्या आधी शून्य जोडावे लागेल. दूरसंचार विभागाने सांगितले की, दूरसंचार कंपन्यांना लँडलाइनच्या सर्व ग्राहकांना शून्य डायल करण्याची सुविधा द्यावी लागेल. सध्या ही सुविधा आपल्या क्षेत्राबाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे. फिक्स लाइन स्वीचमध्ये उपयुक्त घोषणा कराव्यात, ज्यामुळे फिक्स लाइन सबस्क्रायबर्सना सर्व फिक्स्डमधून मोबाईल कॉलच्या पुढे 0 डायल करण्याच्या आवश्यकतेबाबत सांगता येईल, असेही या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

जानेवारीपर्यंतचा दिला अवधीदूरसंचार कंपन्यांना या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी १ जानेवारीपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. डायल करण्याच्या पद्धतीत अशा प्रकारच्या बदलामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाइल सेवेसाठी २५४.४ कोटी अतिरिक्त क्रमांक देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ही भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करील.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMobileमोबाइलNew Delhiनवी दिल्ली