शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील स्टार्ट-अप कंपनीचे नवे संशोधन; २ शास्त्रज्ञांची अवकाश झेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 10:51 IST

आम्ही उपग्रहांसाठी तयार केलेले इंधन ते सध्या वापरल्या जाणाऱ्या इंधनापेक्षा ५० टक्के अधिक कार्यक्षम आहे. 

नवी दिल्ली : अवकाशात उपग्रहांमध्ये इंधन भरण्यासाठी केंद्र उभारण्याची शास्त्रज्ञ तुषार जाधव  व अश्तेषकुमार या दोन शास्त्रज्ञांची योजना आहे. त्यामुळे उपग्रहांची आयुुष्यमर्यादा वाढणार आहे. या योजनेसाठी त्यांनी आपल्या मानस्तु स्पेस या स्टार्ट-अप कंपनीतर्फे संशोधनाला सुरुवात केली आहे.

तुषार जाधव व अश्तेषकुमार हे दोघेही आयआयटी-मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी मानस्तु स्पेस या स्टार्ट-अप कंपनीची स्थापना केली. अंतराळात उपग्रहांमध्ये इंधन भरण्यासाठीचे तंत्रज्ञान सर्वांना परवडणारे असावे असा या दोन्ही शास्त्रज्ञांचा कटाक्ष आहे. उपग्रहांसाठी सध्या कार्सिकोजेनिक स्वरूपाचे इंधन वापरले जाते. त्याऐवजी हरित इंधन वापरण्यावर त्यांचा कटाक्ष आहे. यासंदर्भात मानस्तु स्पेस या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार जाधव यांनी सांगितले की, सध्या उपग्रहांसाठी वापरण्यात येणारे हायड्रेजीन हे इंधन प्रदूषण करणारे आहे. मात्र, आम्ही हायड्रोजन पेरॉक्साईड हे प्रदूषणविरहित इंधन उपग्रहांसाठी विकसित केले आहे. ते कुठेही सहजपणे उपलब्ध होऊ शकते. आम्ही उपग्रहांसाठी तयार केलेले इंधन ते सध्या वापरल्या जाणाऱ्या इंधनापेक्षा ५० टक्के अधिक कार्यक्षम आहे. 

उपग्रहासाठी लागणारी नवी प्रज्वलन यंत्रणाही मानस्तु स्पेस या कंपनीने शोधून काढली आहे. ती सध्याच्या अशाप्रकारच्या यंत्रणेपेक्षा २० टक्के अधिक कार्यक्षम आहे. पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणारे उपग्रह अंतराळ कचऱ्यापासून स्वत:चे संरक्षण करतात. काही इलेक्ट्रिक प्रोपल्शन यंत्रणेच्या तुलनेत मानस्तु स्पेस या स्टार्ट-अप कंपनीने बनविलेली अशा प्रकारची यंत्रणा अधिक गतिमान आहे. 

पुढील वर्षी आणखी प्रयोग करणारमानस्तु स्पेस या कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी व सहसंस्थापक अश्तेषकुमार यांनी सांगितले की, पुढील दशकात सुमारे ५७ हजार उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच प्रोपल्शन यंत्रणेमुळे २० अब्ज डाॅलरची आर्थिक उलाढाल होणार आहे. आम्ही बनविलेल्या तंत्रज्ञानानुसार अंतराळामध्ये उपग्रहात इंधन भरण्याचा प्रयोग पुढील वर्षी करून बघण्याची इच्छा आहे.