शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे नवे राष्ट्रपती आज ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 06:16 IST

सोमवारी राष्ट्रपतिपदासाठी संपूर्ण देशांत मतदान झाल्यानंतर गुरुवारी देशभरातील मतांची एकाच ठिकाणी मोजणी करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 -  सोमवारी राष्ट्रपतिपदासाठी संपूर्ण देशांत मतदान झाल्यानंतर गुरुवारी देशभरातील मतांची एकाच ठिकाणी मोजणी करण्यात येणार आहे. एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांच्यात सरळ लढत आहे. आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास देशाचे 14 वे राष्ट्रपती कोण असतील हे जाहीर होईल.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाल 24 जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी 20 जुलै रोजीच नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे नाव जाहीर होईल. एनडीएकडे तब्बल 63 टक्के मतांचे पाठबळ असल्याने रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर भाजपा नेत्यांनी तसा दावाच केला आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांचे एकूण मूल्य 10,98,882 असून, विजयासाठी 5,49,442 आवश्यक आहे.
देशाच्या संसद भवनात आणि 31 राज्यांच्या विधान भवनांमध्येही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. यावेळी  संसद भवनात सोमवारी 99 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. 
 
आणखी वाचा ...
रामनाथ कोविंद यांचा विजय का निश्चित मानला जातोय?
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मतदानाच्या 50 टक्यांहून अधिक मते मिळणे आवश्यक आहे. एनडीएकडे स्वत:ची 48 टक्के मते आहेत. याखेरीज 6 विरोधी पक्षांसह ज्या 16 पक्षांनी एनडीए उमेदवार कोविंद यांना पाठिंबा दिला, त्यांच्या मतांचे प्रमाण 15 टक्के आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद यांना किमान 63 टक्के मते निश्चितच मिळू शकतील. कदाचित त्याहून अधिक मतेही ते मिळवू शकतील. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
 
31 राज्यांच्या विधान भवनांमध्ये मतदान...
- राष्ट्रपती निवडण्यासाठी देशाच्या 31 राज्यांच्या विधान भवनांमध्येही मतदान झाले. मिळालेल्या माहितीनुसार त्रिपुरा, उत्तर प्रदेश व गुजराथमधे क्रॉस व्होटिंग झाले. त्रिपुरात पक्षाचा आदेश झुगारून तृणमूलच्या 6 व काँग्रेसच्या 1 बंडखोराने रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचे समजते.
उत्तर प्रदेशात मुलायमसिंगांचे बंधू शिवपाल यादव यांच्या दाव्यानुसार समाजवादी पक्षातल्या सुमारे 10 आमदारांनी कोविंद यांना मतदान केले, गुजराथमधे भाजपचे बंडखोर आमदार नलिन कोटडिया यांनी मीरा कुमारांना मतदान केल्याचे कळते. राजस्थानात तीन तास आधीच मतदान पूर्ण झाले. महाराष्ट्रात 2 तर झारखंडात 4 आमदारांना तुरुंगातून मतदानासाठी आणले गेले.
 
खासदारांसाठी हिरव्या तर आमदारांसाठी गुलाबी मतपत्रिका...
- संसद भवनातील केंद्रावर मतदान करणाऱ्यांमधे प्रामुख्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या प्रमुख मायावती आदींचा समावेश होता. खासदार अभिनेता परेश रावल व हेमामालिनी यांनीही संसद भवनात मतदान केले. मतदान केंद्रावर खासदारांसाठी हिरव्या रंगाच्या तर आमदारांसाठी गुलाबी रंगाच्या मतपत्रिका होत्या.