शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

New Parliament : नव्या संसद भवनात केली सर्वधर्मीय प्रार्थना, जाणून घ्या कोणत्या धर्माचे धर्मगुरु होते सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 10:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. नवीन इमारतीचे उद्घाटन वैदिक विधी व सर्वधर्म प्रार्थनेने करण्यात आले. यावेळी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. नवीन संसदेत सर्वधर्म प्रार्थना सभेत अनेक धर्मांच्या धर्मगुरुंनी प्रार्थना केली. पंतप्रधानांनी येथे 'सेंगोल'ची स्थापना केली. यावेळी पंतप्रधानांसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. सर्वधर्म प्रार्थनेत गुरु आणि विविध धर्मातील लोकांनी पूजा केली.

हिंदू,बौद्ध, ख्रिश्चन, जैन, पारशी, मुस्लिम, शीख यासह अनेक धर्मांच्या धर्मगुरुंनी सर्वधर्मीय प्रार्थनेत प्रार्थना केली. या ऐतिहासिक क्षणावेळीही मोदी सरकारनं सर्वधर्म समभावाचं अचूक टायमिंग साधलं आहे.

New Parliament :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण, लोकसभेत केली संगोलची स्थापना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी हवन विधी केला, तामिळनाडूतील अध्यानम संतांनी वैदिक मंत्रोच्चारात केला होता. लोकसभा सभागृहात बसवल्या जाणाऱ्या सेंगोलचे पूजन केले. 

पंतप्रधान मोदींनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेसह नवीन संसदेच्या लोकसभेच्या चेंबरमध्ये स्पीकरच्या खुर्चीसमोर पवित्र सेंगोल स्थापित केले. या दरम्यान तामिळनाडूच्या अधिनस्थ संतांनी वैदिक मंत्रांचा जप केला. या संपूर्ण विधीमध्ये पंतप्रधानांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचाही सहभाग होता.

नवीन संसदेच्या उद्घाटनानंतर सभागृहात सर्वधर्मीय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२ धर्मांच्या प्रतिनिधींनी पवित्र शब्द म्हटले आणि नवीन संसदेसाठी प्रार्थना केली. प्रार्थना सभेला पंतप्रधान मोदींशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदी