शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

नवीन संसद भवनाच्या खर्चात 29% वाढ, एकूण खर्च 1250 कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 08:24 IST

या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या टाटा प्रोजेक्ट्सने जवळपास 40 टक्के काम पूर्ण केले आहे.

नवी दिल्ली: केंद्रातील भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामात अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या खर्चात 282 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. काही सरकारी सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

या प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर एक वर्षांहून अधिक कालावधीत प्रकल्पाची किंमत सुमारे 29 टक्क्यांनी वाढून सूमारे 1250 कोटी झाली आहे. आधी या प्रकल्पाची किंमत सूमारे 977 कोटी रुपये होती. प्रकल्पाचे भूमिपूजन डिसेंबर 2020 मध्ये झाले होते. या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या टाटा प्रोजेक्ट्सने जवळपास 40 टक्के काम पूर्ण केले आहे. मात्र, बांधकाम पूर्ण करण्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रस्तावित चार मजली इमारत सुमारे 13 एकर क्षेत्रात पसरली आहे. राष्ट्रपती भवनाच्या अगदी जवळ असलेला हा प्रकल्प यापूर्वी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य सोहळ्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.

कोरोना काळातही बांधकाम सुरूकोव्हिडमुळे इतर प्रकल्पांप्रमाणे या प्रकल्पाच्या बांधकामावर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. हे बांधकाम महत्त्वाचे असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळवल्यानंतर ही बंदी उठवण्यात आली. विशेष म्हणजे सध्याच्या ब्रिटीशकालीन इमारतीत आणि खासदारांच्या कार्यालयांमध्ये आधुनिक माहिती-तंत्रज्ञानाच्या सुविधांचा अभाव असल्याने नवीन संसद भवनाचे बांधकाम आवश्यक झाले आहे.

जुनी इमारत जीर्ण झाली1927 मध्ये बांधलेल्या सध्याच्या इमारतीला आता भेगा पडल्याचे अनेक खासदारांनी सांगितले आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या जागांच्या व्यवस्थेच्या बाबतीतही अडचण येत आहे. ही वास्तू भूकंपरोधकही नाही आणि त्यात अग्निसुरक्षा व्यवस्थाही नाही, असेही खासदारांनी सांगितले होते. नवीन इमारतीमध्ये लोकसभा चेंबरमध्ये 888 सदस्यांची आसन क्षमता आहे, जी संयुक्त अधिवेशनादरम्यान 1224 सदस्यांपर्यंत वाढवता येईल. भविष्यातील विस्तारित गरजा लक्षात घेऊन, राज्यसभा चेंबरमध्ये 384 सदस्यांसाठी आसनव्यवस्था असेल.

टॅग्स :Parliamentसंसदdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार