मुंबई : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे सोमवारी रात्री उशिरा मुंबईत आगमन झाले. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबईत येत असून, हे दोन्ही नेते दिवसभर विविध कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व इंडो-पॅसिफिक सहकार्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे.
धोरणात्मक भागीदारीला चालना
पंतप्रधान मोदी यांच्या आमंत्रणावरून एआय इम्पॅक्ट परिषदेत भाग घेण्यासाठी तसेच मुंबईत मोदी यांच्यासह द्विपक्षीय परिषदेत सहभाग घेण्यासाठी मॅक्रॉन भारत दौऱ्यावर आले आहेत. मॅक्रॉन यांची ही भारताची चौथी तर मुंबईची पहिलीच भेट आहे. मुंबईत लोकभवन येथे हे दोन्ही नेते भारत-फ्रान्सच्या धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतील. संध्याकाळी ते भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष २०२६ चे उद्घाटन करतील. दोन्ही देशांमधील व्यावसायिक-उद्योगपती, स्टार्टअप्स, शास्त्रज्ञ यांना ते संबोधित करतील.
Web Summary : French President Macron arrived in Mumbai for meetings with PM Modi. They will review strategic partnerships focusing on defense, technology, and Indo-Pacific cooperation. They will also inaugurate the India-France Year of Innovation 2026, addressing business leaders and scientists, aiming to strengthen bilateral relations.
Web Summary : फ्रांसीसी राष्ट्रपति मैक्रों पीएम मोदी के साथ बैठकों के लिए मुंबई पहुंचे। वे रक्षा, प्रौद्योगिकी और इंडो-पैसिफिक सहयोग पर ध्यान केंद्रित करते हुए रणनीतिक साझेदारी की समीक्षा करेंगे। वे भारत-फ्रांस नवोन्मेष वर्ष 2026 का उद्घाटन करेंगे, व्यापार जगत के नेताओं और वैज्ञानिकों को संबोधित करेंगे, जिसका उद्देश्य द्विपक्षीय संबंधों को मजबूत करना है।