शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी यापुढे सुरक्षेचे नवीन निकष, बसमध्ये महिला कर्मचारी : आॅडिटचे नियम तयार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 04:28 IST

गुरगावच्या रायन इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्याच्या हत्येनंतर, शालेय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच, केंद्र सरकारने सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी व सुरक्षेचे नवे निकष तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

नितीन अग्रवाल।नवी दिल्ली : गुरगावच्या रायन इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्याच्या हत्येनंतर, शालेय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच, केंद्र सरकारने सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी व सुरक्षेचे नवे निकष तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी मंत्रालयातील अधिकाºयांशी या विषयावर बैठक घेतली.बैठकीनंतर मनेका गांधी यांनी सांगितले की, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत काही सूचना आल्या आहेत. स्कूल बसमध्ये किमान एक महिला असावी, या कर्मचाºयांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था सरकारकडून निर्भया फंडातून केली जावी, छेडछाड आणि तत्सम तक्रारीसाठी पोस्को ई-बॉक्स लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चाइल्ड हेल्पलाइन नंबर स्कूल बसमध्ये लावण्यात येतील. शाळेत १०९८ हेल्पलाइन नंबरचा फोन बुथ बनविण्यात येईल.याशिवाय मुलांना लैंगिक शोषणाविषयी सावध करण्यासाठी त्यांना चांगला आणि वाईट स्पर्श याबाबत माहिती देण्यात येईल. या विषयावरील ‘कोमल’ हा चित्रपट मुलांना दाखविण्यात येईल. शाळेत विशेष मोहीम चालविण्यात येईल. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून (एनसीपीसीआर) शाळेत संरक्षण आॅडिट केले जाईल, असेही त्या म्हणाल्या.या सूचनांची परिणामकारक अंमलबजावणी कशी करता येईल, यावर दोन्ही मंत्रालयांतील सहा सचिव विचारविनिमय करतील. सचिवांच्या अहवालाच्या आधारावर त्यांची अंमलबजावणी केली जावी. बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाºयाने सांगितले की, महिला व बालविकास मंत्रालयाकडून मुलांच्या सुरक्षितेबद्दल समाजमाध्यमांसह इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्येही वेगवेगळ््या प्रकारे मोहीम राबवून, लोकांमध्ये जागरूकता केली जात आहे.बाल अधिकारांसाठी काम करणाºया संघटनांचे म्हणणे असे आहे की, मुलांच्या सुरक्षेसाठी आधीच चांगले निकष आहेत, परंतु त्यासाठीचा खर्च टाळण्यासाठी शाळा त्यांची अंमलबजावणी करायला तयार होत नाहीत. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाºयांचा हलगर्जीपणालाच जबाबदार ठरविले जाते.> अभ्यासक्रमात समावेशराष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) आपल्या सगळ््या पुस्तकांत, मुलांच्या शोषणाबाबत माहिती द्यायचा निर्णय घेतला आहे. पुस्तकांत चाइल्ड हेल्पलाइनचे काही महत्त्वाचे नंबर्स असतील. याशिवाय पॉस्को कायदा आणि मुलांचे अधिकार आणि राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाबद्दलही माहिती दिली जाईल.