शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उमा भारतींवर नवे संकट

By admin | Updated: April 20, 2017 00:54 IST

बाबरी प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्ली बाबरी प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि इतर १२ जणांवर गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचल्याचा खटला चालवण्यास परवानगी दिल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची घाईघाईने बुधवारी सायंकाळी बैठक झाली. तिला पक्षाध्यक्ष अमित शाह व वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. काश्मीर प्रश्नाशी सरकार झगडत असताना देशातील धार्मिक शांतता आणि सलोखा बिघडू नये, असेच सरकारला वाटत आहे. न्यायालयाच्या निर्णयावर अडवाणी वा जोशी यांनी काहीही भाष्य केलेले नाही. राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह हे घटनात्मक पदावर असल्याने न्यायालयाने त्यांच्यावर खटला चालवण्यापासून दूर ठेवले आहे. उमा भारती यांना अयोध्येत न जाण्याचा सल्ला पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे : सूरजेवालाबाबरी मशीद जमीनदोस्त झाली त्या प्रकरणातील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केली, ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य ‘नैतिकतेचा उच्च आदर्श’ राखतील आणि राजीनामा देतील, हे बघितले पाहिजे. त्यांचा रोख उमा भारती यांच्याकडे होता. दर्जा, जात, वंश, धर्म किंवा विभाग काहीही असला तरी कायदा हा सगळ््यांसाठी समान आहे, असे सूरजेवाला म्हणाले. पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल समाधान व्यक्त केले व मोदी यांना त्यांच्याच नैतिकतेच्या घोषणांची आठवण असेल, अशी आशा आहे, असे म्हटले.आरोपपत्र मागे घ्या : खा. राऊ तभाजप नेत्यांवर खटला चालवण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर शिवसेनेने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. बाबरीप्रकरणी सरकारने आरोपपत्र मागे घ्यावे आणि मगच राम मंदिर बांधण्याची भाषा करावी, असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाबरी मशीद पाडल्याशिवाय राम मंदिर होणे अशक्य होते. शिवसेना व भाजपचा हाच अजेंडा होता. आताही केंदाचा्र तोच अजेंडा असला पाहिजे. बाबरी मशीद पाडणे हा कट मानला जातो आणि याप्रकरणात नेत्यांविरोधात खटला चालवला जातो हा प्रकार दुर्दैवी आहे, असेही संजय राऊत म्हणाले. प्राणार्पणासही तयार : उमा भारती या निकालामुळे आपण अजिबात अस्वस्थ नसून, राम मंदिराच्यासाठी माझे आयुष्यही द्यायला तयार आहे, असे केंद्रीय मंत्री उमा भारती म्हणाल्या. रामजन्मभूमी मोहिमेमध्ये माझी जी भूमिका होती त्याबद्दल मला अभिमान वाटतो, पश्चाताप होत नाही. राम मंदिरासाठी केलेल्या संघर्षाबद्दल मिळेल, त्या शिक्षेला मी तोंड देईन. कट केल्याच्या आरोपांचा भारती यांनी इन्कार केला. कोणताही कट नव्हता. प्रत्येक गोष्ट उघड होती. मी राम मंदिर मोहिमेमध्ये अभिमान आणि आत्मविश्वासाने सहभागी होते. मी ६ डिसेंबर १९९२ रोजी मी मशिदीच्या ठिकाणी उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले.