शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:01 IST

दोघेही एकाच कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आहेत.

कोटा (राजस्थान) : सराव परीक्षा आणि एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांवर भर तसेच वेळोवेळी ब्रेक घेणे यामुळे घवघवीत यश संपादन करता आले, असे यशाचे ‘गुपित’ रजित गुप्ता आणि सक्षम जिंदाल या विद्यार्थ्यांनी उघड केले. रजित आणि सक्षम देशात सर्वांत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षांपैकी एक जेईई ॲडव्हान्समध्ये पहिले दोन टॉपर आहेत. मेरिट यादीत रजित प्रथम तर सक्षम दुसऱ्या स्थानी आहे. दोघेही एकाच कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आहेत.

रजितला ३६० पैकी ३२२ गुण आहेत. तो म्हणतो- माझ्या मेहनतीला चांगले फळ मिळाले, याचा खूप आनंद आहे. मी दहावीपासूनच या परीक्षेची तयारी करीत होतो. काही खास आणि वेगळी तयारी केली असे नाही. दिलेला अभ्यास पूर्ण करणे वेळेवर मॉडेल्स सोडवणे, यावर मी पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. (वृत्तसंस्था)

उत्तर न जमल्यास...

मला एखाद्या प्रश्नाचे उत्तर जमले नाही तर मी थोडा ब्रेक घ्यायचो. माझ्या लहान बहिणीशी बोलायचो. मग माझा मूड फ्रेश व्हायचा. मी कधीही विचलित झालो नाही की मनात निराशा येऊ दिली नाही. त्याची पुस्तके रचून ठेवली तर ती त्याच्या उंचीपेक्षाही जास्त होतील. त्याने इतके डमी पेपर सोडवले की त्याचाही एक मोठा ढीग तयार होईल, या शब्दांत रजितचे वडील दीपक गुप्ता यांनी मुलाच्या मेहनतीचे वर्णन केले.

‘परदेशात जायचे नाही’

सक्षम हरयाणाच्या हिसार येथील रहिवासी आहे. त्याचे आई-वडील पॅथॉलॉजिस्ट आहेत. तो म्हणाला, मी दोन वर्षे कोटा येथे परीक्षेची तयारी करीत होतो. शिक्षक मला प्लॅन द्यायचे आणि त्याप्रमाणे मी अभ्यास करीत गेलो. मला गणिताची अडचण नव्हती. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांवर फोकस केला. सराव पेपर, त्याचे विश्लेषण याचा खूप फायदा होतो. चुका टाळता येतात. आयआयटी मुंबईला प्रवेश घेणे हे आता माझे ध्येय आहे. परदेशात जायचे आणि चांगल्या संधी शोधायच्या, हे सध्या डोक्यात नाही.

टॅग्स :examपरीक्षा