शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या वडिलांच्या अस्थी भारतात आणा', नेताजींच्या कन्येचे भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 14:35 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी नेताजींच्या अस्थी जापानमधून भारतात आणण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस-फाफ यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांना टोकियो येथील रेन्कोजी मंदिरातून आपल्या वडिलांच्या अस्थी भारतात आणण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नवी दिल्लीत नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. पंतप्रधान मोदी आज राष्ट्रीय राजधानीतील इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.

अनिता बोस-फाफ यांचे भावनिक आवाहनअर्थशास्त्रज्ञ अनिता बोस-फाफ यांनी जर्मनीहून एक निवेदन जारी केले. त्यात त्या म्हणतात की, "स्वतंत्र भारतात राहण्याची माझ्या वडिलांची इच्छा होती. दुर्दैवाने, त्यांच्या अकाली निधनाने त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. निदान त्यांच्या अस्थिकलशाचा भारताच्या मातीला स्पर्श झाला पाहिजे असे मला वाटते. म्हणून मी भारतातील जनतेला आणि भारतातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन करते की, माझ्या वडिलांचे अस्थिकलश भारतात आणण्यासाठी सर्प पक्षांनी प्रयत्न करावेत.'

पंतप्रधान मोदींना भेटण्याची इच्छाअर्थतज्ञ बोस-फाफ म्हणाल्या की, 'माझे वडील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत अनावरण होणार आहे. ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाबत आहे.' दरम्यान, या कार्यक्रमाला त्या हजर राहू शकणार नाहीत, अशी माहिती त्यांनी यापूर्वीच दिली होती. तसेच, वडिलांच्या अस्थी भारतात आणण्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

मोदी नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी त्यांच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंतच्या ड्युटी पथाचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये राज्यनिहाय खाद्यपदार्थांचे स्टॉल, लाल ग्रॅनाईट दगडांनी चहुबाजूंनी हिरवेगार रस्ते, वेंडिंग झोन, पार्किंग लॉट्स आणि चोवीस तास सुरक्षा असेल. इंडिया गेट येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही ते करणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी