शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ अजूनही भयग्रस्त!

By admin | Updated: April 28, 2015 02:10 IST

मृतांचा आकडा १० हजारांच्याही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत असतानाच नेपाळमध्ये अन्न, पाणी, वीज व औषधे या जीवनावश्यक गोष्टींचा जबर तुटवडा निर्माण झाला आहे.

नेपाळ अजूनही भयग्रस्त!आता तुटवड्याची झळ : मृतांची संख्या १० हजारांच्या घरात जाण्याची शक्यताकाठमांडू/ नवी दिल्ली : २० अणुबॉम्बहूनही अधिक शक्तिशाली अशा नेपाळमधील शनिवारच्या विनाशकारी भूकंपाने कोसळलेल्या इमारतींचे ढिगारे उपसण्याचे काम सोमवारी ४८ तास उलटून गेल्यावरही युद्धपातळीवर सुरू असतानाच प्रत्येक तासागणिक या विध्वंसाचे अधिकाधिक रौद्र स्वरूप समोर येत आहे. मृतांचा आकडा १० हजारांच्याही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत असतानाच नेपाळमध्ये अन्न, पाणी, वीज व औषधे या जीवनावश्यक गोष्टींचा जबर तुटवडा निर्माण झाला आहे. भीतीच्या विळख्यात असलेले नागरिक आता या तुटवड्याची झळ सोसत आहेत. दरम्यान, या भूकंपाने भारतातील मृतांची संख्या ७२ झाली असून भूकंपानंतरच्या शक्तिशाली धक्क्यांमुळे (आॅफ्टरशॉक) झालेल्या पडझडीत २८८ जण जखमी झाल आहेत. सर्वाधिक झळ बिहारला बसली असून या राज्यात ५६, उत्तर प्रदेशात १२, प. बंगालमध्ये ३ तर राजस्थानमध्ये एकाचा मृत्यू झाला. सोमवारी पश्चिम बंगाल आणि बिहारच्या नेपाळ सीमेलगतच्या काही जिल्ह्यांत ५.६ तीव्रतेचे भूकंपाचे नवे धक्के जाणवले. पण सुदैवाने त्यात जीवित-वित्तहानी झाली नाही. नेपाळमधील भूकंपग्रस्त बळींचा अधिकृत सरकारी आकडा ३,७२० असला तरीही भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असणाऱ्या काठमांडू शहरात शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले असून दुर्गम डोंगराळ भागातही अनेक लोक ठार झालेले असल्याने बळींचा आकडा ५ हजारांपेक्षा जास्त असेल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नेपाळच्या गृह मंत्रालयाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग   बळींचा आकडा अजूनही २ हजारांपर्यंत असल्याचे सांगत आहे. नेपाळच्या डोंगराळ भागात मदत कार्यकर्ते पोहोचले की मृतांची संख्या झपाट्याने वाढेल असे अधिकारी सांगत असून, हा आकडा १० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नेपाळला ७.९ मॅग्नीट्यूडचा भूकंपाचा धक्का बसला. त्याला ४८ तासांपेक्षा जास्त अवधी उलटून गेला आहे, भारतासह विविध देश मदतीची पराकाष्ठा करीत आहेत.अत्याधुनिक उपकरणे, जमीन खोदणारी यंत्रणा व शिकारी कुत्रे घेऊन मदत कार्यकर्ते ढिगाऱ्याखाली जिवंत व्यक्ती असल्यास शोध घेत आहेत, पण आता ४८ तासांनंतर कोणी जिवंत मिळणे कठीण समजले जात आहे. त्यामुळे मदत कार्यकर्त्यांच्या आशा मावळत आहेत. केंद्राच्या आंतर मंत्रालयीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू नेपाळमध्ये मदतकार्यात समन्वय राखण्यासाठी पोहोचली आहे. भारताने ‘आॅपरेशन मैत्री’अंतर्गत नेपाळमध्ये मदतकार्य चालविले असून, गृह, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू मदत आणि बचाव कार्यात समन्वय राखण्यासाठी काठमांडूला पोहोचली आहे. गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव बी.के. प्रसाद यांच्या नेतृत्वातील चमू नेपाळमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेवरही निगराणी ठेवेल. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय पथक नेपाळला पाठविण्याचा निर्णय झाला. मदतीचे आवाहन नेपाळचे वरिष्ठ अधिकारी लीला मणी पौडाल सद्य:स्थितीबद्दल बोलताना म्हणाल्या की, नागरिकांना दिलासा देणे हे सर्वांत पहिले व मोठे आव्हान आहे. परदेशांनी आमच्या मदतीला यावे, आम्हाला मदत साहित्य व वैद्यकीय अधिकारी द्यावेत अशी आमची विनंती आहे.. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला परदेशी तज्ज्ञांची गरज आहे. तंबू, कोरडे साहित्य, ब्लँकेट, सतरंज्या व औषधे यांची आम्हाला तातडीने गरज आहे. नेपाळकडे भूकंपातून वाचलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर नाहीत. हाडाचे डॉक्टर, मेंदूतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन व पॅरामेडीक यांची तातडीने गरज आहे. पाऊस आणि भूकंपानंतरच्या धक्क्यांमुळे वाहन उलटल्यामुळे तरुण तेलगू नृत्यदिग्दर्शक विजय यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले फिल्म युनिटमधील २० सदस्य सुदैवाने बचावले. सोमवारी पहाटे २ वाजता त्यांच्या वाहनाला अपघात झाला. महाराष्ट्रातील २५० पर्यटकांना दिल्लीला सुखरूप परत आणण्यात सरकारला यश आले. त्यातील १०० जणांना आपापल्या गावी परत पाठवण्यात आले आहे. नेपाळमधील बचावकार्यासाठी शासनाचे वैद्यकीय पथक आवश्यक औषधांच्या साठ्यासह मंगळवारी सकाळी नौसेनेच्या विमानाने काठमांडू येथे जाणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या ४० परिचारिकांची एक तुकडी बसने नेपाळकडे मदतकार्यासाठी रवाना झाली आहे. दुसरी तुकडी मंगळवारी रवाना होईल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली. ‘आॅपरेशन मैत्री’ सर्वात मोठी मोहीम च्भारतातील सुमारे एक हजार प्रशिक्षित कर्मचारी नेपाळमध्ये मदतकार्यात सहभागी आहेत.च्किमान २४ विमाने आणि हेलिकॉप्टर्सची मदतच्भारताने कोणत्याही नैसर्गिक संकटात विदेशी भूमीवर चालविलेली सर्वात मोठी मोहीमच्१३ लष्करी विमाने, एअर इंडिया आणि जेट एअरवेजची ३ नागरी विमाने, ६ एमआय-१७ हेलिकॉप्टर्स, २ अत्याधुुनिक हलकी हेलिकॉप्टर्स सेवेत असून, एमआय-१७ ही दोन हेलिकॉप्टर्स मदतीसाठी सज्ज आहेत.च्दहा टन ब्लँकेटस्, ५० टन पाणी, २२ टन अन्नाची पाकिटे, २ टन औषधे काठमांडूला रवाना.च्लष्कराची तीन फिल्ड हॉस्पिटल, अभियांत्रिकी कृती दल, वैद्यकीय चमू नेपाळमध्ये पोहोचली.हिमालय कोपला!भूकंपाने घरे जमीनदोस्त केली, इमारती कोसळल्या आणि भूकंपानंतर बसणाऱ्या धक्क्याच्या भीतीने लोक खुल्या मैदानात रस्त्यावर तंबू उभारून राहू लागले. रविवारी रात्री कोसळलेल्या पाऊस व थंडीत लोकांची दाणादाण उडवून दिली. भूकंपग्रस्त काठमांडू शहर व उपनगरांत इंधन व औषधांचाही तुटवडा भासू लागला आहे.सेवा परमो धर्म.... मोदींचे टिष्ट्वट राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह (एनडीआरएफ) विविध भारतीय संस्थांनी नेपाळमध्ये मदतकार्यात बजावलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरील संदेशात प्रशंसा केली. मी सर्वांचा आभारी आहे. आपल्या खऱ्या संस्कृतीचे आभार मानायला हवे. ‘सेवा परमो धर्म’ हीच आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. भारताच्या १२५ कोटी जनतेने नेपाळचे दु:ख स्वत:चे मानत मदत देऊ केली आहे, असे ते संदेशात म्हणाले.तीन राज्यांत पुन्हा धक्केनेपाळ आणि देशाच्या काही राज्यांमध्ये भूकंपाचे हादरे अजूनही जाणवत असून सोमवारी सायंकाळी बिहार, पश्चिम बंगाल आणि आसामध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. त्यांची तीव्रता ४ रिश्टरच्या जवळपास होती.