शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:50 IST

राजा रघुवंशी हत्याकांडानंतर सोनमने इंदूरमध्ये तब्बल १४ दिवस वास्तव्य केले, पण याची कोणालाही कल्पना नव्हती.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. राजा याची पत्नी सोनम रघुवंशीने हनिमूनसाठी शिलाँगला गेले असताना आपल्या प्रियकराच्या मदतीने राजाची हत्या केली होती. या हत्याकांडानंतर सोनमने इंदूरमध्ये तब्बल १४ दिवस वास्तव्य केले, पण याची कोणालाही कल्पना नव्हती.

पूर्वनियोजित कट आणि फरार होण्याचे नियोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी शिलाँगमध्ये राजाची हत्या केल्यानंतर, सोनम २५ मे रोजी ट्रेनने इंदूरला परत आली. राजाच्या हत्येसोबतच सोनमने यानंतर कुठे आणि कसे राहायचे, याचेही सविस्तर नियोजन केले होते. म्हणूनच, इंदूरमध्ये आल्यानंतर ती तिच्या माहेरी किंवा सासरच्या घरी न जाता, एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. या फ्लॅटमधून ती राजाच्या बेपत्ता होण्याच्या आणि या प्रकरणाच्या बातम्यांवर लक्ष ठेवून होती. विशेष म्हणजे, हल्ल्यापूर्वी राजा आणि सोनम बराच वेळ एकत्र घालवत होते.

पोलिसांच्या कारवाईनंतर काढला पळ

जेव्हा पोलिसांना शिलाँगमधून काही महत्त्वाचे पुरावे सापडल्याचे सोनमला कळले, तेव्हा तिचा प्रियकर राज कुशवाहाने तिला सांगितले की, ती आता इंदूरमध्ये सुरक्षित नाही. त्यामुळे, इंदूर सोडल्यानंतर सोनम उत्तर प्रदेशातील राजच्या रामपूर गावी जाऊन राहिली. मात्र, अखेर पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि प्रियकर राज कुशवाहासह एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली.

९ लाख रुपये आणि दागिने घेऊन पळण्याचा प्रयत्न

जेव्हा सोनमला तिच्या साथीदारांना अटक झाल्याचे आणि आपले पितळ उघडे पडणार असल्याचे समजले, तेव्हा ती रामपूरहून गाजीपूरमधील एका ढाब्यावर गेली. सोनमने तिच्या प्रियकरासह राजाच्या हत्येचा संपूर्ण कट रचला होता. हत्येनंतर आर्थिक अडचण येऊ नये म्हणून ती घरातून ९ लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन निघाली होती.

पाच आरोपींना अटक, समोरासमोर चौकशी होणार?

आता पोलिसांनी राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी एकूण पाच जणांना अटक केली आहे, ज्यात सोनमचाही समावेश आहे. राज आणि सोनम या दोघांनीही राजाच्या हत्येची कबुली दिली आहे. मात्र, चौकशीदरम्यान ते अजूनही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि फिरवाफिरवी करणारी उत्तरे देत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपींची कसून चौकशी सुरू आहे आणि गरजेनुसार पाचही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल. यामुळे या प्रकरणातील आणखी काही गुंतागुंत समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार