शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
3
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
4
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
5
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
6
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."
7
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
8
'मुरांबा'मध्ये एन्ट्री केलेल्या 'या' चिमुकलीने हिंदीतही केलंय काम, ओळखलंत का?
9
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
10
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
11
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
12
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
13
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
14
पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय
15
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
16
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
17
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
18
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
19
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
20
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश

भारतात विलिनिकरणाचा नेपाळचा होता प्रस्ताव, नेहरूंनी दिला नकार; प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून दावा

By जयदीप दाभोळकर | Updated: January 6, 2021 12:45 IST

जर त्यावेळी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी सिक्कीमप्रमाणे हा प्रस्तावही स्वीकारला असता, पुस्तकातून दावा

ठळक मुद्देनेपाळच्या विलिनिकरणाचा प्रस्ताव नेहरूंनी फेटाळल्याचा पुस्तकातून दावापंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे कामकाजात बराच फरक पडतो पुस्तकात नोंदवलं निरीक्षणही

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकातून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. नेपाळला भारतात विलिन करण्याचा प्रस्ताव नेहरू यांनी फेटळाला होता असा दावा प्रणव मुखर्जी यांनी आपलं पुस्तक ‘द प्रेसिडेंशियल ईयर्स’ यात केला आहे. जवाहरलाल नेहरू यांनी नेपाळच्या विलिनिकरणासाठी राजा त्रिभूवन बीर ब्रिकम शाह यांचा प्रस्ताव नाकारला होता. त्यांच्या ऐवजी इंदिरा गांधी असत्या तर त्यांना असं केलं नसतं असा दावाही पुस्तकातून करण्यात आला आहे. 'नेपाळचं भारतात विलिनिकरण करून तो भारताचाच प्रांत बनवावा असा प्रस्ताव राजा त्रिभूवन बीर ब्रिकम शाह यांनी जवाहरलाल नेहरू यांना दिला होता. परंतु नेहरू यांनी त्यास नकार दिला. जर त्यांच्याजागी इंदिरा गांधी या पंतप्रधान असत्या तर ज्या प्रकारे त्यांनी सिक्कीम सोबत केलं त्याचप्रमाणे याला त्यांनी नकार दिला नसता,' असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. 'नेपाळमध्ये राजेशाही सुरू झाल्यानंतर नेहरूंनी त्या ठिकाणी लोकशाही स्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली. नेपाळचे राजा त्रिभूवन बीर ब्रिकम शाह यांनी नेपाळला भारताचा भाग बनवण्याचा प्रस्ताव सूचवला होता. परंतु नेहरूंनी त्या प्रस्तावाला नकार दिला. नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यांनं तसंच राहावं असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु त्यांच्याजागी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी या संधी स्वीकारली असती. जसं त्यांनी सिक्कीमसोबत केलं होतं,' असंही यात प्रणव मुखर्जी यांनी नमूद केलं. 

पुस्तकात अनेक दिग्गजांचा उल्लेखदेशात मनमोहन सिंग यांचं सरकार असताना प्रणब मुखर्जी राष्ट्रपती झाले. २०१४ मध्ये देशात सत्ताबदल झाला आणि नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. त्यामुळे दोन पंतप्रधानांची कार्यशैली मुखर्जी यांनी जवळून पाहिली. याच कार्यकाळातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुखर्जी यांनी द प्रेसिडेंशियल इयर्स हे पुस्तक लिहिलं आहे. मंगळवारी या पुस्तकाचं प्रकाशन झालं. जवाहरलाल नेहरू असो वा इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी किंवा मग मनमोहन सिंग , या सगळ्याच पंतप्रधानांनी सदनाला कायम आपल्या उपस्थितीची जाणीव करून दिली, असं मुखर्जी यांनी त्यांच्या शेवटच्या पुस्तकात म्हटलं आहे.

संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री भूषवलेल्या प्रणव मुखर्जींनी त्यांच्या पुस्तकातून मोदींना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या पूर्वसुरींकडून प्रेरणा घ्यायला हवी. पहिल्या टर्ममध्ये मोदी सरकारला अनेकदा संसदीय संकटांचा सामना करावा लागला. अशी संकटं टाळण्यासाठी मोदींनी संसदेच्या कामकाजावेळी उपस्थित राहायला हवं, असा मोलाचा सल्ला मुखर्जींनी दिला आहे.पंतप्रधान मोदींनी असंतुष्टांचे आवाज ऐकायला हवेत. संसदेत जास्त वेळा बोलायला हवं. विरोधकांना समजावण्यासाठी आणि देशाशी संवाद साधण्यासाठी, नागरिकांना महत्त्वाच्या विषयांची माहिती देण्यासाठी त्यांनी संसदेचा वापर एक व्यासपीठ म्हणून करायला हवा, असं मत मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे.असंतुष्टांचे आवाज ऐकायला हवेत'पंतप्रधान मोदींनी असंतुष्टांचे आवाज ऐकायला हवेत. संसदेत जास्त वेळा बोलायला हवं. विरोधकांना समजावण्यासाठी आणि देशाशी संवाद साधण्यासाठी, नागरिकांना महत्त्वाच्या विषयांची माहिती देण्यासाठी त्यांनी संसदेचा वापर एक व्यासपीठ म्हणून करायला हवा, असं मत मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात मी विरोधकांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांच्याही संपर्कात होतो. अनेक जटिल मुद्द्यांचं निराकरण करण्यासाठी हा संपर्क कामी यायचा असा अनुभव त्यांनी पुस्तकात नमूद केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असहमत असलेल्यांचे आवाज ऐकायला हवेत. विरोधकांना समजवण्यासाठी आणि देशातील जनतेला विविध विषयांची माहिती देण्यासाठी मोदींनी संसदेचा वापर एक व्यासपीठ म्हणून करायला हवा. त्यांनी संसदेत जास्त बोलायला हवं, असं मतही दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या या पुस्तकातून व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे कामकाजात बराच फरक पडतो, असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं आहे.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूNepalनेपाळ