शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘राफेल विमान खरेदीविषयी वाटाघाटी सुरू’

By admin | Updated: May 17, 2015 01:41 IST

फ्रेंच सरकारशी राफेल विमान खरेदीबाबत वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. चर्चेसाठी एअर मार्शल सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समितीही नेमली आहे,

पणजी : फ्रेंच सरकारशी राफेल विमान खरेदीबाबत वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. चर्चेसाठी एअर मार्शल सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समितीही नेमली आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.राफेल खरेदीविषयी वाटाघाटींसाठी फ्रेंच सरकारने नेमलेली समिती दिल्लीत दाखल झाली आहे, असेही पर्रीकर यांनी सांगितले. भारतीय नौदल व लष्कराची सुमारे अडीचशे विमाने तीस वर्षांपेक्षाही जुनी झाली आहेत. सगळी जुनी हेलिकॉप्टर्स बदलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात सहा सब-मरिन्स तयार केले जातील, असे त्यांनी सांगितले.भारताची शस्त्र क्षमता वाढविली जात आहे. ‘मेक इन इंडिया’ संकल्पना संरक्षण खात्याने स्वीकारली आहे. त्याचा लाभ संरक्षण दलास झाला आहे. ४२ विमाने भारतात तयार केली जातील. पूर्वी सारे व्यवहार ठप्प झाले होते. १ लाख ६० हजार कोटींची भांडवली गुंतवणूक रखडली होती. आम्ही आता निर्यातीवरही लक्ष केंद्रित करीत आहोत, असे पर्रीकर म्हणाले. च्१५ वर्षांत संरक्षण खाते एकही विमान खरेदी करू शकले नव्हते, असा दावाही पर्रीकर यांनी केला. च्लोकपाल व मुख्य दक्षता आयोग नियुक्तीविषयी केंद्र सरकार गंभीर आहे. मात्र, त्याबाबतचे काही विषय हे न्यायालयात आहेत. च्मुख्य माहिती आयुक्त नियुक्तीबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे त्यांनी सांगितले.