शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

गुंतवणूकदार व्हिसाच्या आधारे नीरव मोदीचा ब्रिटनमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 05:43 IST

नीरव मोदी याने ब्रिटनमध्ये प्रवेश करण्याकरिता गुंतवणूकदारांसाठी असलेल्या ‘गोल्डन व्हिसा’चा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

लंडन : पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १४ हजार कोटींना फसवून फरार झालेला कुख्यात हिरे व्यावसायिक नीरव मोदी याने ब्रिटनमध्ये प्रवेश करण्याकरिता गुंतवणूकदारांसाठी असलेल्या ‘गोल्डन व्हिसा’चा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. युरोपीय संघाबाहेरील गुंतवणूकदारांना ब्रिटनकडून हा व्हिसा दिला जातो.ब्रिटिश सरकारच्या रोख्यांत अथवा एखाद्या ब्रिटिश कंपनीच्या समभागांत २ दशलक्ष पौंडांची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीस गोल्डन व्हिसा देण्यात येतो. नीरव मोदीला भारतीय पासपोर्टवरच गोल्डन व्हिसा देण्यात आला. त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. तथापि, त्याने फार पूर्वीच गोल्डन व्हिसा मिळविला.गोल्डन व्हिसाद्वारे विदेशींना ब्रिटनमध्ये काम, शिक्षण वा व्यवसाय करण्याची परवानगी मिळते. एक रकमी गुंतविलेले २ दशलक्ष पौंड पाच वर्षे गुंतवून ठेवल्यास संबंधित व्यक्ती ब्रिटनमध्ये कायमस्वरूपी राहण्यास पात्र ठरतो. नीरव मोदी हा जानेवारी २०१८ पासून फरार असून, त्याला आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्याच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही जारी झालेली आहे. पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदीची पत्नी अ‍ॅमी हिचेही नाव आरोपपत्रात आहे. तीही फरार असून, तिच्याविरुद्धही ईडीतर्फे रेड कॉर्नर नोटीस निघणार आहे. (वृत्तसंस्था)काँग्रेसचे टीकास्त्रनीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केल्याचा दावा मोदी सरकारने केला. मग नीरव मोदी पॅरिस व बेल्जियमला कसा पोहोचला, त्याला लंडनमध्ये डायमंड होल्डिंग ही कंपनी कशी सुरू करता आली, असा सवाल शुक्रवारी काँग्रेसतर्फे करण्यात आला. पासपोर्ट रद्द केल्यानंतर मोदीने सहा देशांत प्रवास केला, याचा उल्लेख करून काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की सरकारी मदत असल्याशिवाय असे कोणालाही करता येणार नाही.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा