शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या प्रकरणात नीरव मोदी फरार घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 01:07 IST

महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)तर्फे डिसेंबर २०१४ पासून सुरू असलेल्या एका प्रकरणात नीरव मोदीला फरार घोषित करण्यात आले. सुरत येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी हा निर्णय जाहीर केला.

मुंबई : महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)तर्फे डिसेंबर २०१४ पासून सुरू असलेल्या एका प्रकरणात नीरव मोदीला फरार घोषित करण्यात आले. सुरत येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी हा निर्णय जाहीर केला. सीआरपीसीच्या कलम ८२ अन्वये ही कारवाई करण्यात आली.हिऱ्यांच्या आयात व निर्यातीचा व्यापार करणा-या नीरव मोदीच्या फायरस्टार इंटरनॅशनल, फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल, राडाशीरज्वेलरी कंपनी या कंपन्यांच्या माध्यमातून हि-यांवरील आवश्यक कर न भरता व्यापार केला जात असल्याचे प्रकरण डीआरआयच्या मुंबई विभागाच्या पथकाने डिसेंबर २०१४ मध्ये उघडकीस आणले होते. सुरतच्या विशेष आर्थिक विभागात असलेल्या मोदीच्या या कंपन्यांद्वारे हा गैरव्यवहार सुरू होता. डीआरआयतर्फे याचा तपास सुरू होता.निर्यात करण्यासाठी हिरे आणताना त्यावरील आयात कर व इतर करांमध्ये सवलत दिली जात असताना याद्वारे आणले गेलेले हिरे स्थानिक बाजारपेठेत विक्री केले जात असल्याचे समोर आल्यानंतर तक्रार करण्यात आली होती. सीमाशुल्क विभागाचा थकवलेला कर व दंडापोटी कंपनीला ४८ कोटी २१ लाख रुपये भरावेलागले होते. या वेळी केलेल्या तपासणीत हाँगकाँग व दुबईला पाठवण्यासाठी तयार करून सहार कार्गो करण्यात आलेल्या सामानाची पाहणी करण्यात आली त्यामध्ये अनेक बाबींचे उल्लंघन झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर करचुकवेगिरी केल्याप्रकरणी नीरव मोदीविरोधात सीमाशुल्क कायद्याच्या कलम १३२, १३५, १४० व भादंविच्या १२० बी अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.२२ जून २०१८ ला मोदीविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले होते. मात्र, तो न सापडल्याने प्रक्रियेनंतर त्याला फरार घोषित करण्यातआले. या निर्णयामुळे मोदीची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया आता डीआरआयला सुरू करता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदी