शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

पाण्याचे दुर्भिक्ष्य थांबविण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज

By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST

जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. कोकणात न थांबणारे पाणी आहे. जोरदार पाऊस असतो, पण कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. ही समस्या थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथे आयोजित १० व्या जलसाहित्य संमेलनात व्यक्त केले.

जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. कोकणात न थांबणारे पाणी आहे. जोरदार पाऊस असतो, पण कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. ही समस्या थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथे आयोजित १० व्या जलसाहित्य संमेलनात व्यक्त केले.
या संमेलनाच्या आयोजनस्थळाला स्व.भवरलाल जैननगर असे नाव देण्यात आले असून, या नगरात संमेलनाचे उद्घाटन गीते यांच्याहस्ते झाले. या वेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, डॉ.अशोक कुकडे, जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.दत्ता देशकर, आमदार सदानंद चव्हाण, जैन इरिगेशनचे विपणनप्रमुख अभय जैन, गजानन देशपांडे, आनंद गुप्ते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गीते म्हणाले, कोकणातील जमीन पाण्याचा निचरा करणारी आहे. धो धो पडणार्‍या पावसाचे पाणी अडविता आले तर उन्हाळ्यातील पाणीटंचाईची समस्या दूर होईल. कृषी क्षेत्रातील आघाडीवर असलेली जैन इरिगेशन ही कंपनी कोकणासाठी काही तरी चांगले करू पाहत असल्याचा आनंद गीते यांनी व्यक्त केला.

कोकणात लाखो हेक्टर जमीन आहे. पण सिंचन मात्र नाही. काही हजार हेक्टरसाठी सिंचनाची सुविधा आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोकणात केळीच्या पुनरूज्जीवनासाठी अनेक शेतकरी पुढे येत असून, ते उच्च तंत्रज्ञान अंगीकारत आहेत. त्याला चालना दिली जाईल, असे पालकमंत्री रवींद्र वायकर म्हणाले.
कोकणातील शेतकर्‍यांचा विकास व्हावा यासाठी जैन इरिगेशन प्रयत्नशील आहे. जैन इरिगेशनच्या अतिघनदाट आंबा लागवड पद्धतीने या पिकाचा चांगला विकास, विस्तार होईल. तसेच आंबा प्रक्रिया उद्योगासाठी मदत करू, असे जैन इरिगेशनचे विपणन संचालक अभय जैन म्हणाले.

लातुरातील भीषण पाणीटंचाईमागेल मानवाच्या चुकाही आहे. तेथे सध्या एक दिवसाआड पाणी दिले जाते. पण तेथे पाणीटंचाई दूर करण्यासाठी मांजरेचे पात्र १६ कि.मी. मोकळे केले. मोठी यंत्रणा त्यासाठी कार्यरत झाली. आठ कोटींमध्ये हे काम झाले. ३० बुलडोझर रात्रंदिवस काम करीत होते. आम्ही काम केले, पण कुणी पावत्या मागितल्या नाहीत. पारदर्शकपणे काम केले. रोजच्या कामाचे हिशेब व्हॉट्स ॲपवर प्रसारित केले. तेथे चांगले काम शक्य झाले. लोकसहभाग वाढला, असे संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अशोक कुकडे म्हणाले. डॉ.दत्ता देशकर यांनीही मनोगत व्यक्त केले.