शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बॅड लोन्सच्या मुक्तीसाठी साडेसहा लाख कोटी गरज

By admin | Updated: March 31, 2017 00:36 IST

भारतीय बँकांचे १४ लाख कोटी रुपये तणावपूर्ण मालमत्तेच्या (विविध कारणांनी थकलेली कर्जे) स्वरूपात अडकून पडले

नवी दिल्ली : भारतीय बँकांचे १४ लाख कोटी रुपये तणावपूर्ण मालमत्तेच्या (विविध कारणांनी थकलेली कर्जे) स्वरूपात अडकून पडले असून या बॅड लोन्समधून मुक्त होण्यासाठी बँकांना किमान ६,५0,000 कोटी रुपयांची गरज आहे, असे प्रतिपादन कोटक महिंद्रा बँकेचे कार्यकारी व्हाइस चेअरमन तथा कार्यकारी संचालक उदय कोटक यांनी केले आहे.उदय कोटक यांनी सांगितले की, आमच्या अंतर्गत संशोधनानुसार, भारतीय बँकांतील एकूण तणावपूर्ण मालमत्ता १४ लाख कोटींची आहे. त्यात अनुत्पादक मालमत्ता (एनपीए), पुनर्रचित मालमत्ता, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या, धोरणात्मक कर्ज पुनर्रचना (एसडीआर), ५:२५ योजना आणि औद्योगिक कर्ज पुनर्रचना (सीडीआर) यांचा समावेश आहे. यातील ३0 टक्के मालमत्ता बुडीत गृहीत धराव्या लागतील. याचाच अर्थ ४ लाख कोटी रुपयांची नेट तूट बँकांना भरून काढावी लागेल. ही ४ लाख कोटी रुपयाची रक्कम बँकिंग व्यवस्थेतील एकूण भांडवलाच्या अर्धी आहे. उरलेल्या १0 लाख कोटींच्या भांडवलाचा मुद्दा सोडविण्यासाठी आणखी २.५ लाख कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. अशा प्रकारे या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी बँकांना साडेसहा लाख कोटी रुपयांची गरज लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)बॅड बँकांची गरजतणावपूर्ण १४ लाख कोटी रुपयांपैकी १0 लाख कोटी रुपये बॅड बँकेकडे हस्तांतरित करता येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला दोन ते तीन मोठ्या बॅड बँकां स्थापन करण्याची गरज आहे, असे मला वाटते. बॅड बँकांच्या स्थापनेवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. बॅड बँका सामान्य बँकांची तणावपूर्ण कर्जे विकत घेतील. तसेच त्यांच्या वसुलीची प्रक्रिया राबवतील. चांगल्या प्रकारे भांडवल असलेल्या बॅड बँका असायला हव्यात. त्यातील मोठा हिस्सा खासगी क्षेत्रातून आलेला असावा.