धर्मांतर रोखण्यासाठी कायद्याची गरज राजनाथसिंग: राजकीय पक्षांनी विचार करावा
By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST
लखनौ : धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी धर्मांतरबंदी कायद्याची गरज आहे़अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी यावर गंभीरपणे विचार करावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी शनिवारी केले़
धर्मांतर रोखण्यासाठी कायद्याची गरज राजनाथसिंग: राजकीय पक्षांनी विचार करावा
लखनौ : धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी धर्मांतरबंदी कायद्याची गरज आहे़अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी यावर गंभीरपणे विचार करावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी शनिवारी केले़येथील एका कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते़ धर्मांतर मुद्यावर कायद्याची गरज आहे आणि हा कायदा साकारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी समोर येणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले, धर्मांतर मुद्यावर पंतप्रधानांनी बयान द्यावे, या विरोधकांनी लावून धरलेल्या मागणीकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सरकारचा कुठलाही मंत्री बोलला तरी ती सरकारची भूमिका असते, हे विरोधकांना कळायला हवे़