शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बोगद्यात अडकलेल्या मजुरांची काही वेळातच सुटका होणार; एनडीआरएफने सुरू केली मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 21:25 IST

उत्तरकाशी येथील बोगद्यात गेल्या ११ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उत्तरकाशी येथील बोगद्यात गेल्या ११ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत आज बुधवारी सायंकाळी उशिरा एक मोठी घटना उघडकीस आली. या संदर्भात एक व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये एनडीआरएफचे जवान ऑक्सिजन सिलिंडर घेऊन उत्तरकाशीच्या सिलकियारा बोगद्यात बचाव कार्यात मदत करत असल्याचे दिसत आहे. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी ४५ मीटर पाईप खोदण्याचे काम बचाव कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले आहे. कर्मचारीही दोरी आणि स्ट्रेचरसह बोगद्याच्या आत जाताना दिसत आहेत. आता अडकलेल्या मजुरांना  लवकरच बाहेर काढले जाईल, अशी अपेक्षा आहे.

अमेरिकेनं हाणून पाडला खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा कट, भारताला दिला इशारा

पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी बुधवारी सांगितले होते की, पुढील टप्प्याचे काम दोन तासांत सुरू होईल. खुल्बे हे सध्या उत्तराखंड पर्यटन विभागात विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. 'मला हे सांगायला खूप आनंद होत आहे की, आम्ही जे काम गेल्या १ तासापासून करत होतो, त्यामध्ये आम्ही अमेरिकन ऑगर मशीनने आणखी ६ मीटर लांबीचे ड्रिल केले आहे. मला आशा आहे की पुढील टप्प्याचे काम येत्या २४ तासांत सुरू होईल.

बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांपैकी गब्बर सिंग नेगी आणि सबा अहमद हे इतरांचे मनोबल वाढवत असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. सर्व मजुरांचे मनोबल उंचावेल यासाठी योगासने यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुरक्षित परतण्याची वाट पाहत आहे. या मजुरांनी ११ दिवसांपासून सूर्यप्रकाशही पाहिलेला नाही. या मजुरांना पाईपद्वारे अन्न पुरवले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कामगारांना रोज गरम जेवण दिले जात आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड