शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी संबंधित निर्बंध संपणार! केंद्राच्या राज्य सरकारांना नियमांचा पुनर्विचार करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 15:23 IST

केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना व्हायरसशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांबाबत आवश्यक सल्ला दिला आहे.

केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना व्हायरसशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांबाबत आवश्यक सल्ला दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना विषाणू (कोविड -19) च्या प्रतिबंधासाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वं रद्द करण्याचा विचार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी करावा, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. मास्कच्या वापरासह इतर कोविड प्रतिबंधक उपायांवरील सल्ले यापुढे सुरूच राहतील, असंही सांगण्यात आलं आहे. यापूर्वी, सरकारनं परिस्थिती सुधारण्यासाठी आणि साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर NDMA ने निर्णय घेतला की कोविड प्रतिबंधक उपायांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी लागू करण्याची आता गरज नाही.

25 फेब्रुवारी 2022 रोजी गृह मंत्रालयाचा सध्याचा आदेश क्रमांक 40-3/2020-DM-1 (A) च्या समाप्तीनंतर, गृह मंत्रालयानं आता नवा कोणताही आदेश जारी करणार नाही असं सांगितलं जात आहे. पण आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MDHFW) संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सल्ला देत राहील. यामध्ये मास्कचा वापर करणं आणि वारंवार हात स्वच्छ करणं यांचा समावेश असेल. गेल्या 24 महिन्यांत, रोग निदान, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार आणि लसीकरणासोबतच रुग्णालयातील पायाभूत सुविधा, जागरूकता आणि सामान्य लोकांसाठी सुविधांचा विकास यासारख्या विविध बाबी हाती घेण्यात आल्या आहेत. महामारीच्या व्यवस्थापनासाठी या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, असं सरकारनं आपल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे. 

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी उचललं पाऊलराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनीही त्यांच्या बाजूनं सर्व पावले उचलली आहेत, असं सरकारच्या वतीनं असे सांगण्यात आलं आहे. यासाठी स्वतःची यंत्रणा राज्यांनी विकसित केली आहे आणि साथीच्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी त्यांच्या विस्तृत योजनांची अंमलबजावणी केली आहे. यासोबतच गेल्या सात आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट  0.28 टक्क्यांवर आला आहे.

देशात किती रुग्ण नोंदवले गेले?भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे एकूण 1,778 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 2,542 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 62 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 4,30,12,749 वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्ण 23,087 इतके आहेत. एकूण मृत्यू 5,16,605 आणि एकूण लसीकरण 1,81,89,15,234  इतकं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCorona vaccineकोरोनाची लस