शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha 2019 Exit Poll: 6 राज्यांत NDA आघाडीवर राहणार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ फुलणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 20:06 IST

इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून प्रत्येक राज्यात जनतेमध्ये भाजप आणि काँग्रेसबद्दल काय वातावरण हे समोर आलं आहे.

नवी दिल्लीः  लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर अनेक माध्यमांनी एक्झिट पोलचे अंदाज वर्तवले असून, यातून निकालांचे कल जाणून घेतले आहेत. इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून प्रत्येक राज्यात जनतेमध्ये भाजप आणि काँग्रेसबद्दल काय वातावरण हे समोर आलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणात जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्लीतल्या सातही जागांवर भाजपाचं कमळ फुलणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावलेल्या राज्यांत भाजपाला भरभरून जागा मिळण्याची शक्यता आहे.राजस्थानमध्ये भाजपाला 25पैकी 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसच्या खात्यात 2 जागा जाऊ शकतात. तर दुसरीकडे छत्तीसगडमध्ये भाजपाला 11 जागांपैकी 7 ते 8 जागा मिळणाची शक्यता आहे. तर काँग्रेसला 3 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशातल्या 29 जागांपैकी भाजपाला 26-28 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसला 1 ते 3 जागा मिळण्याचा कयास आहे.गुजरातमध्ये मोदी लाट कायम असून इथे 26पैकी 25 जागा एनडीएला मिळू शकतात. तर गोव्यातील दोन जागाही भाजपा राखण्याचं एक्झिट पोलमधून सांगण्यात आलं आहे. 6 राज्यात एनडीएला 130 जागा मिळण्याचा अंदाज असून, यूपीए 10 जागांवर मर्यादित राहणार असल्याचं या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019Rajasthan Lok Sabha Election 2019राजस्थान लोकसभा निवडणूक 2019Madhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी