शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मरावे परी कीर्तिरूपे उरावे! 20 महिन्यांच्या चिमुकलीने 5 लोकांना दिलं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 13:57 IST

Organ Donation : धनिष्ठा असं या चिमुकलीचं नाव असून ती सर्वात लहान वयाची डोनर ठरली आहे.

नवी दिल्ली - मरावे परी कीर्तिरूपे उरावे अशीच एक घटना समोर आली आहे. 20 महिन्यांच्या चिमुकलीने पाच जणांना जीवदान दिले आहे. धनिष्ठा असं या चिमुकलीचं नाव असून ती सर्वात लहान वयाची डोनर ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी परिसरात राहणाऱ्या धनिष्ठाने आपल्या निधनानंतर समाजासमोर एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. 20 महिन्यांच्या धनिष्ठाने पाच जणांना तिचे अवयव दान केले. हृदय, लिव्हर, दोन्ही किडन्या आणि दोन्ही कॉर्निया दान केल्या आहेत. 

8 जानेवारी रोजी संध्याकाळी धनिष्ठा आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर खेळत असताना खाली पडली होती. पडल्यानंतर तातडीने तिला उपचारासाठी बेशुद्धावस्थेत सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही या चिमुकलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. 11 जानेवारी रोजी डॉक्टरांनी धनिष्ठाला ब्रेन डेड म्हणून घोषित केलं. मेंदूव्यतिरिक्त तिचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत होते. अशा परिस्थितीतही चिमुकलीचे आई-वडील आशिष कुमार आणि बबिता यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे आपल्या मुलीचे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. 

आशिष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही रुग्णालयात राहून असे अनेक रुग्ण पाहिले, ज्यांना अवयवांची अतिशय आवश्यकता आहे. आम्ही आमच्या धनिष्ठाला गमावलं आहे. मात्र तिचं अवयव दान करुन, फक्त तिचे अवयव इतर रुग्णांमध्ये जिवंत राहणार नाहीत तर त्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठीही मदत होईल असं म्हटलं आहे. रुग्णालयातील डॉक्टरांसह अनेकांनी चिमुकलीच्या कुटुंबियांचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच आभार मानले आहेत. 

अवयव दानाचं हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. इतरांनीही यातून प्रेरणा घेतली पाहिजे, असं सर गंगा राम रुग्णालयाचे डॉ. डीएस राणा चेअरमन (बोर्ड ऑफ़ मॅनेजमेंट) यांनी म्हटलं आहे. तसंच 0.26 प्रति मिलियन इतका भारतात अवयव दानाचा सर्वात कमी दर आहे. अवयव निकामी झाल्याने दर वर्षी भारतात सरासरी 5 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Organ donationअवयव दानhospitalहॉस्पिटलdelhiदिल्लीdoctorडॉक्टर