शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन निवडीवरून राष्ट्रवादीत खदखद? युवक पदाधिकाऱ्याचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 02:38 IST

परिवहन समितीच्या रिक्त झालेल्या सहा जागांवर नवीन सदस्यांची निवड होणार आहे. सदस्यपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत खदखद निर्माण झाली आहे.

नवी मुंबई  - परिवहन समितीच्या रिक्त झालेल्या सहा जागांवर नवीन सदस्यांची निवड होणार आहे. सदस्यपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत खदखद निर्माण झाली आहे. परिवहन समिती सदस्यपदाचे आश्वासन देऊनही ऐनवेळी डावलल्याने राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण लोकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.परिवहन समितीच्या निवृत्त होणाºया सहा जागांवर २९ जून रोजी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी बुधवारी नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आली. विशेष म्हणजे, प्रवीण लोकरे हे राष्ट्रवादीचे जुने व तितकेच निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या वेळी परिवहन समितीवर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता होती. माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासह पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांनीसुद्धा त्यांना असे आश्वासन दिले होते; परंतु ऐन वेळी त्यांच्या नावाला कात्री लावण्यात आली, त्यामुळे लोकरे व त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. १८ वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही केवळ आश्वासनावर बोळवण होत असेल तर यापुढे पक्षाचे काम करणार नाही, असा पवित्रा घेत लोकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा संजीव नाईक यांच्याकडे सादर केला आहे. नियमानुसार पुढील दोन-तीन दिवसांत युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना आपल्या पदाचा राजीनामा पाठविणार असल्याचे लोकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांतील खदखद समोर आल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. या प्रकरणी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.अनेक कार्यकर्ते नाराजमागील १८ वर्षांत वारंवार मला डावलण्यात आले. महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असतानाही तिकीट नाकारण्यात आले. कधी शिक्षण तर कधी परिवहन समितीवर पाठविण्याचे आश्वासन देऊन बोळवण करण्यात आली.किमान या वेळी तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु या वेळीसुद्धा तोच प्रकार झाल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. युवक राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते येत्या काळात पक्षाचा राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे लोकरे यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस