वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलीस आयुक्तांना राष्ट्रवादीचे निवेदन
By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST
नाशिक : पोलिसांची गुन्हेगारांवरील पकड सैल झाल्यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून गुंडांचे राज्य सुरू असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़ या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार जयवंत जाधव यांनी पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांना निवेदनाद्वारे दिला आहे़
वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलीस आयुक्तांना राष्ट्रवादीचे निवेदन
नाशिक : पोलिसांची गुन्हेगारांवरील पकड सैल झाल्यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून गुंडांचे राज्य सुरू असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़ या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार जयवंत जाधव यांनी पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांना निवेदनाद्वारे दिला आहे़गतवर्षात शहरात २६ खुनाच्या घटना घडल्या होत्या, तर यावर्षी सहा महिन्यांतच हा आकडा पार झाला आहे़ याबरोबरच २० खुनाचे प्रयत्न, १४ बलात्कार, ३ दरोडे, ११३ घरफोडी, ७१ जबरी चोरी, ४०६ वाहन व मोबाइल चोर्या, ४७ विनयभंगाचे गुन्हे घडलेले आहेत़ सध्या शहरात किरकोळ कारणावरून हाणामारी, चाकू हल्ला, नागरिकांची लुटमार, चेन स्नॅचिंग, चोर्या-दरोडे, घरफोड्या, वाहनांची जाळपोळ, अपहरण, खून, खंडणी, अवैध धंदे वाढले असून त्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे़यावेळी राष्ट्रवादीचे नेते नाना महाले, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, महापालिका स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी चुंभळे, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, महिला शहराध्यक्ष सुनीता निमसे, शोभा मगर, छबू नागरे, नगरसेवक विक्रांत मते, समाधान जाधव, छायाताई ठाकरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)