शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांच्या एकजुटीला राष्ट्रवादीचा हादरा, शरद पवार यांची गैरहजेरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:41 IST

सत्तारूढ भाजपला सशक्त पर्याय उभा करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न केले जात असताना नितीशकुमार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपला सशक्त पर्याय उभा करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न केले जात असताना नितीशकुमार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला. तथापि, शरद पवार यांना बरे वाटत नसल्याने ते बैठकीला येऊ शकले नाहीत, असे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला १६ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.गुजरातनंतर राष्टÑवादी काँग्रेस केंद्रातही भाजपशी हातमिळविणी करण्याचा गंभीर विचार करीत असून, मोदी सरकारमध्ये भागीदार होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. परंतु त्या दृष्टीने अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे.मोदींविरुद्ध राजकीय वातावरण तयार करण्यासाठी देशव्यापी संघर्ष करण्याचा निर्णय डाव्या पक्षांनी घेतला आहे. यात सामील व्हायचे की नाही, याचा निर्णय अन्य पक्षांना घ्यायचा आहे, असे येचुरी यांनी सांगितले. गुजरातेमधील राज्यसभेच्या निवडणुकीतील भाजपच्या भूमिकेची तुलना माफियांच्या टोळीशी केली. भाजपने गुजरातमधील निवडणुकीत जे काही केले, त्यावरून आगामी निवडणुकीत तो पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा तर्क बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी काढला. बैठकीला अहमद पटेलही उपस्थित होते. गुलाम नबी आझाद म्हणाले की, विरोधी पक्ष एकत्र येऊ न मोदी सरकारविरुद्ध मोहीम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. सर्व पक्षांशी चर्चा करून कार्यक्रम तयार करण्यासाठी कोअर कमिटी स्थापन करण्याचे अधिकार सोनिया गांधी यांना देण्यात आले आहेत.महारॅलीत सहभागी होणार२७ आॅगस्ट रोजी लालूप्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या महारॅलीत सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. विरोधी पक्षांच्या एकजुटीचे प्रयत्न शाबूत ठेवण्यासाठी गुलाम नबी आझाद हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्याशी चर्चा करतील.आजच्या बैठकीत केरळमधील मणी ग्रुपसुद्धा सहभागी होऊ शकला नाही. मनमोहनसिंग, अहमद पटेल, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अली अन्वर, डी. राजा, सतीश मिश्रा, नरेश अग्रवाल, बद्रीऊद्दीन अजमल, ए. के. अ‍ॅन्टोनी बैठकीला उपस्थित होते.