शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नामपूरला राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलभरो आंदोलन

By admin | Updated: September 16, 2015 22:40 IST

नामपूर : येथील साक्री चौफुलीवर ठरलेल्या नियोजनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसले. या ठिकाणी सरकारविरोधात संतप्त शेतकरी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत होते. या आंदोलनाचे नेतृत्व खेमराज कोर, अशोक सावंत, नामदेव सावंत, संजय चव्हाण, दीपिका चव्हाण यांनी केले.

नामपूर : येथील साक्री चौफुलीवर ठरलेल्या नियोजनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसले. या ठिकाणी सरकारविरोधात संतप्त शेतकरी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत होते. या आंदोलनाचे नेतृत्व खेमराज कोर, अशोक सावंत, नामदेव सावंत, संजय चव्हाण, दीपिका चव्हाण यांनी केले.नामपूरला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष शिवाय शेळ्या, मेंढ्या जनावरे आंदोलनात सहभागी झाले होते. उपस्थित शेतकर्‍यांसमोर सरपंच प्रमोद सावंत, प्रवीण सामंत, रवींद्र धोंडगे, कडू धोंडगे, कारभारी मोरे, ॲड. रेखा शिंदे, जितेंद्र सूर्यवंशी, पंढरीनाथ आहिरे, शशिकांत कोर, दीपक सावंत, प्रल्हाद आहिरे, राघो पाटील, जानकी ठाकरे, पंचशीला खरे, डॉ. नरेश गायकवाड, प्रवेश ठाकरे, महेश धांेडगे, शशिकांत आहिरे, हेमंत कोर यांनी मनोगत व्यक्त केले. खेमराज कोर, संजय चव्हाण, अशोक सावंत यांनी शासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. ११ वाजेपासून सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल पोलीस प्रशासनाने सकाळी ८ वाजेपासूनच घेतली होती. आंदोलन जरी राष्ट्रवादीचे असले तरी मनसे, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी हजर होते. यामुळे नामपूर भागातील दुष्काळाची तीव्रता अधिक दिसत होती. स्थानिक सेना-भाजपा नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकरी वर्गात या नेत्याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. या आंदोलनात शेळ्या, मेंढ्या व जनावरे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या. दुपारी २ वाजेनंतर शेतकर्‍यांची गर्दी वाढतच असल्यामुळे पुढे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून पोलीस ठाण्यात पाठवले. यानंतर कलम ६८ प्रमाणे अटक करून कलम ६९ प्रमाणे सर्वांना सायं. ४ वाजेपर्यंत सोडून दिले. सहायक पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भावराव काळे, पोलीस पाटील बाजीराव सावंत, स्थानिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)---फोटो कॅप्शन- १)नामपूरला आंदोलनात मार्गदर्शन करताना खेमराज कोर, २) नामपूरला जेलभरो आंदोलनात अटक करून घेताना माजी आमदार संजय चव्हाण, अशोक सावंत, आमदार दीपिका चव्हाण, खेमराज कोर, ॲड. रेखा शिंदे, नामदेव सावंत, सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते.