शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

नागरि सुविधांसाठी राष्ट्रवादीचे उपोषण पालिकेच्या चौकशीची मागणी : प्रलंबित कामे पूर्ण करा

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

कोपरगाव : सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व जनविकास आघाडीच्या वतीने कोपरगाव पालिकेसमोर सोमवारपासून उपोषण सुरू करण्यात आले़ प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला़

कोपरगाव : सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व जनविकास आघाडीच्या वतीने कोपरगाव पालिकेसमोर सोमवारपासून उपोषण सुरू करण्यात आले़ प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला़
कोपरगाव शहराला पाणी पुरवठा तीन दिवसाआड करावा, येसगाव येथील साठवण तलाव क्रमांक चारचे चार वर्षापासून बंद असलेले काम तातडीने सुरू करावे, ठेकेदारावर दंडात्मक कारावाई करावी, कोपरगाव शहरातील विस्थापित लोकांना गाळे वाटप करावेत, शहरातील मुख्यरस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करून धुळ मुक्त कोपरगाव करावे, जलतरण तलाव जनतेसाठी खुला करावा, धारणगाव रस्त्याचे प्रलंबीत काम मार्गी लावावे, बांधकाम विभागातील अनागोंदी कारभार थांबवावा, माधव बागेचे सुशोभिकरण करावे, कत्तलखान्याचे काम पुर्ण करावे आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या़ यावेळी आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संदिप वर्पे, दिपक साळूंके, दत्तोबा जगताप, जनविकास आघाडीचे अध्यक्ष विजय आढाव, मिनल खांबेकर, अशोक खांबेकर, वैशाली आढाव, मायादेवी खरे, शमीमबी कुरेशी, सुनिल गंगुले, दिनार कुदळे, कृष्णा आढाव, मुकूंद इंगळे, नवाज कुरेशी, प्रसाद आढाव, संतोष चवंडके आदी उपस्थित होते़
आशुतोष काळे म्हणाले, जनतेला मुलभुत सुविधा मिळाव्यात यासाठी हे उपोषण आहे़ पालिका प्रशासनावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही़ तेव्हा जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करून कामे मार्गी लावावीत़ संदिप वर्पे म्हणाले, मुख्याधिकार्‍यांनी आमच्या प्रश्नावर दिलेली उत्तरे समर्पक नाहीत, निवडक नगरसेवक, ठेकेदार व मुख्याधिकारी गैरकारभार करीत आहेत़ या कामाची प्रशासकिय यंत्रणेने चौकशी करावी, विजय आढाव यांनी हे उपोषण प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळे पर्यंत सोडले जाणार नाही असे स्पष्ट केले़
फोटो- 15062015कोप01 उपोषण
कॅप्शन- कोपरगाव शहराच्या विविध प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस व जनविकास आघाडीच्या वतीने पालिकेसमोर उपोषण सुरू करण्यात आले़ (छाया- हेमचंद्र भवर)