राष्ट्रवादी काँग्रेसला मिनी विधानसभेत सत्तेची संधी विजयासाठी जोर आवश्यक : तीन तालुके वगळता सर्वच ठिकाणी सदस्य
By admin | Updated: January 26, 2017 02:07 IST
जळगाव : जिल्हा परिषदेच्या गत निवडणुकीत दुसर्या क्रमांकांचा पक्ष राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिनी विधानसभेमध्ये विजयाची संधी आहे. मात्र चार तालुक्यांमध्ये मेहनत घेण्याची आवश्यता आहे. यावल, जामनेर व एरंडोल हे तीन तालुके वगळता सर्वच तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचे जि.प.व पं.स.सदस्य आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला मिनी विधानसभेत सत्तेची संधी विजयासाठी जोर आवश्यक : तीन तालुके वगळता सर्वच ठिकाणी सदस्य
जळगाव : जिल्हा परिषदेच्या गत निवडणुकीत दुसर्या क्रमांकांचा पक्ष राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिनी विधानसभेमध्ये विजयाची संधी आहे. मात्र चार तालुक्यांमध्ये मेहनत घेण्याची आवश्यता आहे. यावल, जामनेर व एरंडोल हे तीन तालुके वगळता सर्वच तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचे जि.प.व पं.स.सदस्य आहेत.गेल्या निवडणुकीत दुसर्या क्रमांकाचा पक्षगेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जि.प. गटातील २० व पंचायत समिती गटातील ४२ उमेदवार विजयी झाले होते. जिल्ह्यातील १९ गटांमध्ये पक्षाचा उमेदवार हा दुसर्या क्रमांकावर होता. तर १२ गटांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी तिसर्या क्रमांकाची मते मिळविली होती. त्यामुळे ३९ गटांमध्ये राष्ट्रवादीची शक्ती ही चांगली आहे.विधानसभेत एकमेव आमदार विजयीगेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार होते.चाळीसगाव, जळगाव ग्रामीण,पाचोरा,चोपडा,भुसावळ या पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार तर अमळनेर मतदार संघातील अपक्ष आमदार साहेबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व घेतले होते. मागील निवडणुक माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्त्वाखाली लढविण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकमेव आमदार डॉ.सतीश पाटील हे विजयी झाले आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये हा लक्ष्यवेधी फरक आहे.चार तालुक्यांमध्ये जोर आवश्यकराष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे यावल व जामनेर या दोन तालुक्यात एकही सदस्य नाही. आमदार संजय सावकारे हे राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये गेल्यामुळे या तालुक्यात राष्ट्रवादीची कठीण अवस्था आहे. एरंडोल तालुक्यामध्ये एकमेव पंचायत समिती सदस्य आहे. या चार तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे.४ सभापतींसह ४२ सदस्यजिल्ह्यातील १५ पंचायत समितीपैकी चार पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. १५ पंचायत समित्यांमध्ये ४२ सदस्य विजयी झालेले आहेत. पंचायत समित्यांमध्ये देखील राष्ट्रवादी हा दुसर्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. सर्वाधिक सात पं.स.सदस्य हे चाळीसगाव व चोपडा तालुक्यात आहेत. सद्यस्थितीला चोपडा,चाळीसगाव व पारोळा या तीन ठिकाणी राष्ट्रवादीचे सभापती आहेत. तर भडगावमध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या बळावर अपक्ष उमेदवार सभापती आहेत.आघाडी केल्यामुळे होईल लाभराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्या २० जि.प.सदस्य आहेत. काही ठिकाणी मोजक्या मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झालेले आहेत. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेपासून लांब राहिलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसने आघाडी केली आहे. त्यामुळे मतांचे विभाजन कमी होऊन त्याचा लाभ राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे.